धक्कादायक! अभिनेत्री फातिमा सना शेखला अनोळखी व्यक्तीने मारला पंच

फातिमाचा हा किस्सा अतिशय धक्कादायक 

Updated: Apr 27, 2021, 11:12 AM IST
धक्कादायक! अभिनेत्री फातिमा सना शेखला अनोळखी व्यक्तीने मारला पंच title=

मुंबई : दंगल सिनेमातून चर्चेत आलेली अभिनेत्री फातिमा सना शेख सध्या मोठ्या प्रोजेक्टमध्ये दिसत आहे. दंगल सिनेमाची देखील जोरदार चर्चा रंगली. फातिमाचं या सिनेमामुळे खूप कौतुक झालं. फातिमा फक्त सिनेमातचं नाही तर खासगी आयुष्यातही खूप स्ट्राँग आहे. हे स्पष्ट करणारा एक मजेशीर किस्सा सनाने शेअर केला आहे. 

एका मुलाखतीत फतिमाने एक किस्सा शेअर केला होता. फातिमाला एक मुलगा छेडत असताना फातिमा त्याच्याशी भांडली. त्याचवेळी तिच्या वडिलांनी त्या मुलाला चांगलच सुनावलंय. फातिमाच्या म्हणण्यानुसार तिचे वडिल स्ट्राँग सपोर्ट सिस्टम आहे. तिने एक किस्सा शेअर केला आहे. यामध्ये फातिमाने सांगितलं आहे की,'एकदा जिममधून फातिमा चालली होती. तेव्हा एक व्यक्ती तिला सतत बघत होता. फातिमाने त्या व्यक्तीला स्पष्टपणे विचारलं की, का मला टक लावून बघत आहेस? तेव्हा फातिमाला पाहणं त्याला आवडत असल्याचं त्याने म्हटलं आहे.'

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Fatima Sana Shaikh (@fatimasanashaikh)

त्यानंतर त्यांच्यात शाब्दिक वाद झाले. या गडबडीत त्या व्यक्तीने फातिमाच्या चेहऱ्याला हात लावला. याचा राग म्हणून फातिमाने तिला कानाखाली लगावली. याला प्रतिउत्तर म्हणून त्या व्यक्तीने फातिमाला चक्क मुक्का मारला आणि ती बेशुद्ध झाली. हा संपूर्ण प्राकर जेव्हा फातिमाच्या वडिलांना कळला तेव्हा त्यांनी त्या व्यक्तीची कायदेशीर दखल घेतली. 

कमल हासनच्या चाची 420 मध्ये दिसणार 

फातिमा सना शेखने चाची 420 मध्ये एका गोंडस मुलीचा रोल साकारला आहे. सिनेमात कमल हासन तिच्या वडिलांच्या भूमिकेत होते. 2016 मध्ये आमिर खानच्या 'दंगल' सिनेमातून पुन्हा एकदा लोकप्रियता मिळवली.