अरेरे! पदार्पणातच Shanaya Kapoor सोबत घडला वाईट प्रकार; आता पुढे काय?

त्याआधीपासूनच शनायाच्या नावाची चर्चा मात्र आतापासूनच सुरु झाली आहे. 

Updated: Mar 28, 2022, 02:19 PM IST
अरेरे! पदार्पणातच Shanaya Kapoor सोबत घडला वाईट प्रकार; आता पुढे काय?  title=
छाया सौजन्य- सोशल मीडिया

मुंबई : हिंदी कलाजगतामध्ये सध्याच्या घडीला बऱ्याच नवख्या कलाकारांची एंट्री झाली आहे. हे नवखे कलाकार म्हणजे दुसरं तिसरं कुणी नसून हा नवा चेहरा आहे कपूर कुटुंबातील एका सदस्याचा. 

अभिनेता संजय कपूर आणि माहीप कपूर यांची ही लेक शनाया सध्या बॉलिवूडमध्ये पदार्पणासाठी सज्ज होत आहे. पण, त्याआधीपासूनच शनायाच्या नावाची चर्चा मात्र आतापासूनच सुरु झाली आहे. (Shanaya Kapoor )

बॉलिवूड चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येण्यासाठी उत्सुक असणाऱ्या याच शनायाचा एका कार्यक्रमात आलेला अनुभव मात्र फारसा चांगला होता, असं मात्र दिसत नाही. 

नुकतीच शनाया सेलिब्रिटी फॅशन डिझायनर मनिष मल्होत्रा याच्या कलेक्शनला सादर करण्यासाठी रॅम्पवर उतरली आणि तिच्या चालण्याची पद्धत पाहून सोशल मीडियावर एकच चर्चा सुरु झाली. 

ही बदकासाठी का चालतेय... अरे रे हा तर आता पर्यंतचा सर्वाच वाईट वॉक होता अशाच प्रतिक्रिया अनेकांनी दिल्या. 

थोडक्यात काय तर शनायाची सुरुवात काही फारशी चांगली झालेली नाही. आता मुद्दा असा, की शनाया या खच्चीकरणाला सामोरं जात त्यावर मात करणार की नव्या जोमानं या ट्रोलर्सना न जुमानता पुन्हा नव्यानं पदार्पणाच्या तयारीला लागणार ?