Salman ला वाढदिवसाचं पहिलं गिफ्ट कोणाकडून, जाणून बसेल धक्का

पाहा Video 

Updated: Dec 27, 2021, 10:10 AM IST
Salman ला वाढदिवसाचं पहिलं गिफ्ट कोणाकडून, जाणून बसेल धक्का  title=
छाया सौजन्य- सोशल मीडिया

मुंबई : अभिनेता सलमान खान 56 वर्षांचा झाला आहे. वाढदिवसानिमित्त त्याच्या पनवेल येथील फार्महाऊसवर सध्या एकच कल्ला पाहायला मिळत आहे. बॉलिवूडचा सुपरस्टार आणि चाहत्यांचा भाईजान सध्या त्याचे कुटुंबीय आणि काही खास मित्रमंडळींसोबत वेळ व्यतीत करत आहे.

सलमानचा वाढदिवस म्हटलं की, तिथं त्याला शुभेच्छा आणि खास भेट देण्यासाठी सर्वांचीच गडबड असणार. 

तुम्हाला माहितीये का, यंदाच्या वर्षी सलमानला वाढदिवसाचं सर्वात पहिलं गिफ्ट कोणी दिलं? 

खुद्द सलमाननंच माध्यमांशी संवाद साधताना याबाबतचा खुलासा केला, की आपल्याला वाढदिवसाचं सर्वात पहिलं गिफ्ट हे 'त्या' सापानं दिलं.

सापानं आपल्याला दंश मारल्यानंतर तिथं 'चावला... चावला' असा एकच गोंधळ झाला. त्यानंतर बावरलेल्या सापानं आणखी एक दंश मारला... इतक्यावरच न थांबता तिसऱ्यांदाही त्यानं तेच केलं. 

सापाची ही करामत पाहता त्यानंटच आपल्याला वाढदिवसाचं गिफ्ट दिल्याचं सलमान म्हणतो.

दरम्यान, वाढदिवसाच्या दिवशी आईकडूनच पहिल्या शुभेच्छा मिळतात. यंदा यात थोडा वेळ गेला पण सुदैवानं आम्ही सर्व कुटुंबीय इथं एकत्र आहोत असं म्हणत सलमाननं आनंद व्यक्त केला. 

सलमान खानला (Salman Khan) चावलेल्या साप (Snake) अखेर सापडला आहे. त्या सापाला बाटलीबंद करण्यात आलं आहे.