Salman Khan Affairs: सलमानचंही स्थळ कुणीतरी नाकारलंय; नाहीतर आज असता 'या' अभिनेत्रीचा पती?

Salman Khan Affairs: लग्नासाठी आलेल्या स्थळाकडून होकार आला नाही की अनेकदा चिंता वाढते किंवा मग हिरमोड होतो. तुम्हीआम्हीच नव्हे तर खुद्द सलमान खाननंही असाच नकार पचवला आहे. माहितीये का?   

Updated: Feb 2, 2023, 02:59 PM IST
Salman Khan Affairs: सलमानचंही स्थळ कुणीतरी नाकारलंय; नाहीतर आज असता 'या' अभिनेत्रीचा पती? title=
bollywood Salman Khan Affairs with Juhi Chawla grabs attention after so many years

Salman Khan Love Life : अभिनेता (Salman Khan) सलमान खान अद्यापही बॉलिवूडचा (Bollywood) मोस्ट एलिजिबल बॅचलर आहे. करिअरच्या सुरुवातीपासून ते अगदी आता साठीच्या दिशेनं वाटचाल करत असतानाही या अभिनेत्याच्या खासगी आयुष्याबाबतच्या चर्चा काही केल्या कमी झालेल्या नाहीत. (Salman Khan wedding) सलमान इतकी वर्षे अविवाहित का राहिला? त्याला कुणी हक्काचं जोडीदार मिळालं नाही का? असा प्रश्न तुम्हाला पडला असेल तर तसं नाहीये. कारण, सलमानचं लग्नही ठरलं होतं. इतकंच काय, तर लग्नाच्या पत्रिकाही छापून झाल्या होत्या. 

....आणि लग्न तुटलं 

सलमान खान आणि अभिनेत्री संगीता बिजलानी (Sangeeta Bijlani) या दोघांच्याही प्रेमाच्या नात्याच्या कलाजगतात बऱ्याच चर्चा झाल्या. तिचं त्याच्या कुटुंबासमवेत असणारं नातं दिवसागणिक घनिष्ट होत गेलं. पण, एका क्षणात सारंकाही बिनसलं आणि सलमान अविवाहितच राहिला. हो पण, पुढे सलमान आणि संगीताची मैत्री मात्र कायम राहिली. 

'या' अभिनेत्रीसोबतचं त्याचं नातं फार कमीच जगासमोर आलं

संगीतासोबत नातं तुटल्यानंतर सलमानचं नाव अनेक अभिनेत्रींशी जोडलं गेलं. त्यातचं एक नाव मात्र फारसं जगासमोर आलं नाही. ते नाव होतं अभिनेत्री (Juhi Chawla) जुही चावलाचं. असं म्हणतात की संगीतासोबतच्या नात्यात दुरावा आल्यानंतर सलमानच्या मनात जुहीनं घर केलं होतं. किंबहुना त्यानं प्रेमाच्या या नात्यासाठी तिचं घर गाठल्याचंही म्हटलं गेलं. 

हेसुद्धा वाचा : Pathaan Box Office Collection Day 8 : 'पठान'च्या कमाईचं तुफान; शाहरुखच्या कारकिर्दीतील सर्वात यशस्वी चित्रपट 

मनोरंजन विश्वात असणाऱ्या चर्चांनुसार सलमान स्वत:चच स्थळ घेऊन जुहीच्या घरी गेला होता. एका मुलाखतीत त्यानंच याबाबतचा खुलासा केला होता. जुही आपल्याला आवडत होती, त्यामुळं तिला मागणी घालण्यासाठी थेट तिचं घर गाठलं होतं. पण, जुहीच्या वडिलांनी मात्र सलमानचं स्थळ नाकारलं आणि म्हणे त्याचं हे नातंही अपूर्णच राहिलं. आता सलमान आणि त्याच्या खासगी आयुष्याचे आणखी किती पैलू चाहत्यांसमोर नव्यानं उलगडणार हे फक्त सलमानच सांगू शकणार आहे.