'जेव्हा नर्गिस दत्त माझ्या बेडवर झोपली होती!' कोण होता तो? त्या रात्री नेमकं काय घडलं?

दिवगंत अभिनेत्री नरगिस दत्त यांचा चाहता वर्ग खूप मोठा होता. अनेकांची ही अभिनेत्री फेवरेट होती. एक काळ असा होता की या अभिनेत्रीचे सिनेमे पाहण्यासाठी प्रेक्षक चित्रपटगृहाबाहेर रांगा लावत. त्यांच्या साधेपणावर चाहते त्यांच्या प्रेमात होते.

Updated: Nov 28, 2023, 07:02 PM IST
'जेव्हा नर्गिस दत्त माझ्या बेडवर झोपली होती!' कोण होता तो? त्या रात्री नेमकं काय घडलं? title=

मुंबई : दिवगंत अभिनेत्री नरगिस दत्त यांचा चाहता वर्ग खूप मोठा होता.  अनेकांची ही अभिनेत्री फेवरेट होती. एक काळ असा होता की या अभिनेत्रीचे सिनेमे पाहण्यासाठी प्रेक्षक चित्रपटगृहाबाहेर रांगा लावत. त्यांच्या साधेपणावर चाहते त्यांच्या प्रेमात होते. नरगिस या पहिल्या अशा अभिनेत्री होत्या ज्यांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं होतं.  3 मे 1981 मध्ये नर्गिसने यांनी या जगाचा निरोप घेतला. मात्र तुम्हाला माहितीये का या अभिनेत्रीसोबत एक किस्सा घडला होता. जो तिने स्वत: सांगितला होता. एका प्रसिद्ध लेखकाने तिला सांगितलं होतं की, नर्गिस दत्त माझ्या बेडवर झोपली होती असं मला सगळ्यांना सांगावं लागेल. हे ऐकून सगळेच हैराण झाले होते. चला तर जाणून घेवूयात हे संपुर्ण प्रकरण नेमकं काय आहे.

एका प्रसिद्ध लेखकाला नर्गिस यांनी एकदा अचानक फोन केला आणि तिने त्यांना भेटायचं आहे असं सांगितलं. लेखकाला सुरुवातीला खरंतर यावर विश्वास बसला नाही. मात्र त्यांनी लगेजच तिला भेटायला यायला सांगितलं. अर्ध्या तासातच नर्गिस त्यांनाा भेटण्यासाठी पोहोचली. तिची मुले सनावर (कसौली, हिमाचल प्रदेश) येथे शिकतात. मला तिथे शाळेतील एका कार्यक्रमासाठी जायचं आहे. मात्र तिथले सगळे हॉटेल बूक आहेत. पुढे नर्गिस म्हणाल्या 'मला समजलं आहे की, तुमचं तिथे व्हिला आहे. तुम्ही मला तिथे फक्त एक दिवस राहू देवू शकता का?'

मग ते लेखक तरी अभिनेत्रीला कसा नकार देणार होते. मात्र त्यांनी तिची थोडी गंमत केली आणि तिला म्हटलं की, मला काहीच हरकत नाही पण माझी एक अट आहे. हे ऐकून नर्गिस हैराण झाली पुढे त्यांनी तिला त्यांची अट सांगितली. ते म्हणाले, अट अशी आहे की तुम्ही तिथे राहिल्यानंतर मी लोकांना सांगू शकेन की, नर्गिस दत्त माझ्या बेडवर झोपली होती. हे ऐकताच नर्गिस यांना हसू अनावर झालं आणि म्हणाल्या चालेल मी सहमत आहे. त्यांची ही विनोदी बुद्धि नर्गिस यांना प्रचंड आवडली.  जेव्हा केव्हा तिच्या मित्रांमध्ये या लेखकाचा उल्लेख व्हायचा तेव्हा ती हा किस्सा त्यांना नक्कीच  सांगायची. स्वत: या लेखकाने त्यांच्या एका लेखात या घटनेबद्दल लिहिलं आहे.