'तिला कोणी पाहणारही नाही'; दिग्दर्शकाच्या या वक्तव्यावर अखेर बोलली कतरिना

अखेर कतरिनाने यावर तिची प्रतिक्रिया दिली आहे.

Updated: Mar 10, 2020, 05:44 PM IST
'तिला कोणी पाहणारही नाही'; दिग्दर्शकाच्या या वक्तव्यावर अखेर बोलली कतरिना  title=
कतरिना कैफ

मुंबई : 'सूर्यवंशी' Sooryavanshi या चित्रपटाच्या निमित्ताने अभिनेत्री कतरिना कैफ गेल्या काही दिवसांपासून विविध कार्यक्रमांना हजेरी लावत आहे. अक्षय कुमार, रणवीर सिंग, अजय देवगन यांच्या मुख्य भूमिका असणाऱ्या या चित्रपटातून कतरिनाही झळकणार आहे. पण, चित्रपटातील एका फ्रेममध्ये तिच्याडकडे कोणी पाहणारच नाही, असं एका दिग्दर्शकाने म्हटल्याची बरीच वेडीवाकडी चर्चा सध्या बॉलिवूड वर्तुळात रंगू लागली आहे. 

चित्रपटाविषयी वक्तव्य करणारा हा दिग्दर्शक म्हणजे रोहित शेट्टी. चित्रपटातील एका दृश्याचा उल्लेख करत त्यामध्ये अक्षय कुमार, रणवीर सिंग आणि अजय देवगन झळकत आहेत. कतरिनाही या दृश्यात आहे. ज्यामध्ये पार्श्वभूमीत बॉम्बस्फोटही घडत आहे. हे एकंदर चित्र पाहता तिच्याकडे कोण पाहणार नाही, या शब्दांत रोहितने त्याचं मत मांडल्याचं म्हटलं गेलं. 

रोहितचे हेच उदगार पाहता कतरिनाने इन्स्टाग्राम स्टेटस पोस्टच्या माध्यमातून काही गोष्टी स्पष्ट केल्या. रोहित नेमकं काय म्हणाला होता ते शब्द इथे फिरवण्यात आले आहेत. यशिवाय त्यांच्या वक्तव्यातून काही शब्दही वगळण्यात आले आहेत, हे तिने स्पष्ट केलं. 

कतरिनाने तिच्या पोस्टमध्ये लिहिलं तरी काय? 

'मित्रांनो....
मी सहा माध्यमांमध्ये येणारं वृत्त किंवा लेखांवर  प्रतिक्रिया देत नाही. पण, याप्रकरणी सांगावं तर मला असं वाटतं की, रोहित शेट्टी (सर) यांनी केलेलं वक्तव्य चुकीच्या पद्धतीने सर्वांपुढे मांडण्यात आलं. परिणामी त्याचा पूर्णपणे गैरसमज करण्यात आला. मी त्याच वक्तव्याविषयी बोलत आहे, जेथे रोहित शेट्टी म्हणाले होते, ''कोणीही (त्या फ्रेममध्ये) माझ्याकडे पाहणार नाही. कारण तिथे तीन मुलगे आहेत. शिवाय त्यात बॉम्बस्फोटही होत आहे'', मुळात ते असं म्हणाले नव्हते. 

मी त्या दृश्याच झळकली आहे, असं म्हटलं होतं. त्यावर रोहित सरांनी सांगितलं होतं या फ्रेममध्ये एकाच वेळी चार माणसं आहेत. त्याशिवाय यात बॉम्बस्फोटही होत आहे. त्यामुळे कोणाच्याही इतक्या कमी वेळासाठीची झलक लक्षात येणार नाही. बरं असं असतानाही आम्ही त्या दृश्यासाठी खूप सारे रिटेक घेतले होते'

width: 640px; height: 800px;

'Sooryavanshi': Katrina Kaif clarifies Rohit Shetty's statement

रोहित शेट्टी यांच्यासोबतच्या आपल्या समीकरणाविषयी सांगत कतरिनाने त्यांची आपल्याला कारकिर्दीत जेव्हा मदत लागली आहे तेव्हा ते कायम मदतीसाठी पुढे आले असल्याची बाब व्यक्त केली. शिवाय त्यांचं वक्तव्य चुकीच्या पद्धतीने मांडण्यात आल्याचं म्हणत तिने अवाजवी चर्चांना पूर्णविराम दिला.