Karva Chauth ला अनिल कपूर यांच्याच घरी का येतात सेलिब्रिटींच्या पत्नी?

सेलिब्रिटी वर्तुळातही करवा चौथच्या उपवासाची रंगत पाहायला मिळते.

Updated: Oct 25, 2021, 09:35 AM IST
Karva Chauth ला अनिल कपूर यांच्याच घरी का येतात सेलिब्रिटींच्या पत्नी? title=
छाया सौजन्य- इन्स्टाग्राम

मुंबई : पती, पत्नीच्या नात्याला आणखी दृढ करणारा आणि प्रामुख्यानं भारतातील उत्तरेकडील राज्यांमध्ये मोठ्या उत्साहात साजरा केला जाणारा एक सण म्हणजे करवा चौथ. दिवसभराचा उपवास आणि त्यानं चंद्रदर्शनानं साध्य होणारं हे व्रत करण्यामागे तशाच भावनाही आहेत. पतीचं दीर्घायुष्य, त्याची साथ कायम लाभावी यासाठीचा हा उपवास. सेलिब्रिटी वर्तुळातही करवा चौथच्या उपवासाची रंगत पाहायला मिळते.

शिल्पा शेट्टीपासून ते अगदी हिंदी कलाविश्वातील सर्वच विवाहितांमध्ये या सणाचा उत्साह असतो. दरवर्षीप्रमाणेच यंदाही करवा चौथ मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. बॉलिवूडमध्ये अभिनेता अनिल कपूर यांच्या घरी दरवर्षी सेलिब्रिटींच्या पत्नी हा उपवास सोडण्यासाठी येतात.

एकत्र येऊ धमाल मजा मस्ती करत हा उपवास सोडला जातो. यंदाच्याही वर्षी अनिल कपूर यांच्या घरी असंच चित्र पाहायला मिळालं. अनिल कपूर यांच्य पत्नी सुनिता कपूर इथं सारीव्यवस्था करतात आणि आता तर जणू इथं करवा चौथ साजरा करण्याची परंपराच झाली आहे. ज्यामुळं सेलिब्रिटींच्या पत्नी इथंच येऊन हा सण साजरा करतात.

यंदाच्या वर्षी अभिनेता शाहीद कपूर याची पत्नी मीरा राजपूत कपूर, अभिनेत्री पद्मिनी कोल्हापूरे, त्यांची सून शाजा मोरानी शर्मा, रिमा जैन या सोहळ्यासाठी इथं पोहोचल्या होत्या. यंदाही इथं जंगी पार्टीचं आयोजन करण्यात आलं होतं. सोशल मीडियावर या ग्रँड करवा चौथ सेलिब्रेशनचे अनेक फोटोही व्हायरल झाले.