किती मोठा त्याग.... अभिनेत्याच्या दुसऱ्या पत्नीचा काळजावर दगड ठेवून आई न होण्याचा निर्णय

असा निर्णय घेणाऱ्या महिला फार कमीच... ही त्यापैकीच एक   

Updated: Apr 26, 2022, 10:02 AM IST
किती मोठा त्याग.... अभिनेत्याच्या दुसऱ्या पत्नीचा काळजावर दगड ठेवून आई न होण्याचा निर्णय title=
प्रतिकात्मक छायाचित्र

मुंबई : आजच्या घडीला महिला सर्व क्षेत्रांमध्ये सक्षम होताना दिसत आहे. फक्त सक्षमच नव्हे तर वेळप्रसंगी हीच महिला कठोर आणि तितकेच मोठे निर्णयही घेताना दिसत आहे. कुटुंबाच्या हितासाठी, स्वत:च्या, आपल्या जवळच्या माणसांच्या हितासाठी महिलांनी घेतलेल्या कैक निर्णयांमुळे आज अनेक गोष्टी सुकर आहेत. आता या कोणत्या गोष्टी आहेत याचा पाढा वाचल्यास तो न संपणारा आहे. (Bollywood Actor wife)

कलाजगताशी संलग्न असणाऱ्या एका महिलेनं असाच निर्णय घेतला आणि तिच्या या निर्णयानं सर्वांची मनं जिंकली. मोठ्या पडद्यावर ती सक्रिय नसतानाही, या एका निर्णयानं या महिलेला प्रसिद्धीझोतात आणलं. 

तिचा हा निर्णय होता, आई न होण्याचा. पतीला पहिल्या पत्नीपासून असणाऱ्या मुलांचा सांभाळ करण्याचा निर्णय तिनं घेतला होता. अभिनेत्या दुसरी पत्नी असूनही या महिलेनं स्वत:च्या मुलांना जन्म न देण्याचा निर्णय़ घेतला होता. 

ही महिला म्हणजे कपूर कुटुंबाची सून, अभिनेते शम्मी कपूर यांची दुसरी पत्नी नीला देवी. शम्मी यांच्या पहिल्या पत्नीच्या म्हणजेच अभिनेत्री गीता बाली यांच्या निधनानंतर मुलांसाठी म्हणून त्यांनी नीला देवी यांच्याशी लग्न केलं. (Shammi kapoor wife nila devi)

मुलं लहान असल्यामुळं त्यांना वडिलांच्या या दुसऱ्या लग्नाची काहीच कल्पना नव्हती. पण, ज्यावेळी ही बाब त्यांच्या समोर आली तेव्हा मात्र त्यांनी मोठ्या आपलेपणानं आपल्या या दुसऱ्या आईचा स्वीकार केला. 

Ranbir - Aliaच्या लग्नाला महिनाही उलटला नाही, तोच चर्चा दुसऱ्या लग्नाच्या ठिणगीची?

दिवसागणिक हे नातं आणखी घट्ट झालं. आपली ही आई अतिशय उत्कृष्ट महिला असल्याचं वक्तव्य खुद्द शम्मी कपूर यांचे चिरंजीव आदित्य यांनीही केलं होतं. (Bollywood Aditya kapoor)

कुटुंबासाठी म्हणून इतका मोठा त्याग करणाऱ्या नीला देवी या हल्लीच अभिनेत्री आलिया भट्ट आणि अभिनेता रणबीर कपूर यांच्या विवाहसोहळ्याला उपस्थित राहिल्या होत्या. कपूर कुटुंबातील अनेक कार्यक्रम आणि समारंभांना त्यांची हजेरी असल्याचं पाहायला मिळतं. (Alia bhatt ranbir kapoor wedding)