Sharon Stone: जेव्हा तिला कळालं... Shah Rukh बाजूलाच बसलाय, हॉलिवूड अभिनेत्री King Khan वर फिदा!

Sharon Stone, Shah Rukh Khan: एखाद्या शोमध्ये शाहरूखचा जलवा मात्र नेहमी पहायला मिळतो. नुकताच शाहरुख खान सौदी अरेबियातील रेड सी फिल्म फेस्टिव्हल 2022 (Red Sea IFF22) मध्ये दिसला होता.

Updated: Dec 3, 2022, 11:42 PM IST
Sharon Stone: जेव्हा तिला कळालं... Shah Rukh बाजूलाच बसलाय, हॉलिवूड अभिनेत्री King Khan वर फिदा! title=
Sharon Stone, Shah Rukh Khan

Shah Rukh Khan Video Viral: शाहरुख खान (Shah Rukh Khan) म्हणजे तरुणांच्या गळ्यातील ताईत... गेली 4 दशकं आपल्या अभिनयाच्या जोरावर शाहरूखने बॉलिवूडमधील (Bollywood) सर्वोच्च स्थान मिळवलं. आज त्याची बॉलिवूडचा किंग म्हणून ओळख निर्माण झाली आहे. शाहरूखची फॅन फॉलोविंग हा एक वेगळाच विषय... दरवर्षी किंग खानच्या वाढदिवसाला त्याची एक झलक पाहण्यासाठी 'मन्नत'बाहेर (Mannat) मोठा घोळका जमलेला दिसून येतो. फक्त भारतातच नाही तर जगभरात शाहरूखचे मोठे (Shah Rukh Khan Fans) चाहते आहेत.

मागील काही दिवसांपासून शाहरूखने मोठ्या चित्रपटांना (Shah Rukh Khan Movies) हात लावला नाही. एखाद्या शोमध्ये शाहरूखचा जलवा मात्र नेहमी पहायला मिळतो. नुकताच शाहरुख खान सौदी अरेबियातील रेड सी फिल्म फेस्टिव्हल 2022 (Red Sea IFF22) मध्ये दिसला होता. त्यावेळी एक वेगळंच चित्र पहायला मिळालं. सध्या सोशल मीडियावर हा व्हिडीओ तुफान व्हायरल (Viral Video) होताना दिसतोय.

आणखी वाचा - kantara vs Tumbbad : 'कांतारा' आणि 'तुंबाड' वरून नव्या वादाला फुटल तोंड, जाणून घ्या वाद

रेड सी फिल्म फेस्टिव्हलमध्ये शाहरूखने हजेरी लावली होती. ज्यावेळी शाहरूख कार्यक्रमात पोहोचला तेव्हा कार्यक्रमात अंधार होता. एक डान्स प्रोग्राम सुरू असल्याने बॅकग्राऊंड लाईट्स बंद करण्यात आल्या होत्या. त्यावेळी शाहरूख आयोजित स्थळी जाऊन बसला. थोड्या वेळात अँकरने शाहरूखवर लाईट स्पॉट (Spotlight) करत शाहरूखचं स्वागत केलं. त्यावेळी शेजारी बसलेली हॉलिवूड अभिनेत्री शेरॉन स्टोन (Sharon Stone) देखील शॉक झाली.

पाहा Video -

दरम्यान, शाहरूखने नेहमीप्रमाणे सर्वांचं उभं राहून आभार मानले. शाहरूखला पाहून शेरॉनला (Sharon Stone Shocked) धक्का बसला. आपल्या शेजारी शाहरूख बसलाय, याची कल्पना देखील शेरॉनला नव्हती. त्यावेळी टाळ्यांच्या कडकडात किंग खानचं (King Khan) स्वागत देखील करण्यात आलं. या कार्यक्रमात शाहरूखला भारतीय चित्रपटातील योगदानाबद्दल पुरस्कार देखील देण्यात आला. मात्र, शेरॉनची रिएक्शन सर्वत्र चर्चेचा विषय राहिली.