मुंबई : अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा ही एकाचवेळी दोन सिनेमांचे शूटिंग करीत आहे. 'वेलकम टू न्यूयॉर्क' आणि 'हॅप्पी भाग जाएगी रिटर्न्स' हे दोन आगामी सिनिमे लवकर प्रदर्शित होणार आहेत.
यातील 'हॅप्पी भाग जाएगी रिटर्न्स' हा सिनेमा वादात सापडला आहे. या सिनेमाचे शूटिंग थायलंडमध्ये सुरु आहे. या शूटिंगच्यावेळी ज्या ठिकाणी चित्रिकरण सुरु होते तेथे काही वस्तू सापडल्यात त्यामुळे हा सिनेमा वादात सापडलाय.
या सिनेमाच्या निमित्ताने काही पॉर्न सीन सिनेमात घुसविण्याच प्रकार आहे, असा आरोप होत आहे. मीडियाच्या सूत्रांनुसार बॅंकॉक पोलिसांनी निर्माता कंपनी 'इंडी बँकॉक लिमिटेड' वर पॉर्न सीन चित्रित केलाचा आरोप केलाय. 'द नेशन' च्या रिपोर्टनुसार सिनेमाच्या शूटिंगच्यावेळी एक महिला मॉडेलला अॅडल्स टॉयसोबत पाहिले आहे. या महिलेच्या शरीरावर एकही कपडा नव्हता. एका स्थानिक व्यक्तीने हा सीन कॅमेऱ्यात कैद केलाय. त्याने तो फेसबूकवर अपलोड केला. त्यानंतर स्थानिक पोलिसांनी सोशल मीडियाची दखल घेत कारवाई केली.
(फोटो साभार- इंस्टाग्राम)