Farhan- shibani wedding फू बाईss फू; फरहान- शिबानीच्या लग्नात कोणी घातल्या फुगड्या?

बॉलिवूडमध्ये एकदा का लग्नसराईचे वारे वाहू लागले की, चाहत्यांच्या नजरा आपोआपच इथे वळू लागतात. 

Updated: Feb 23, 2022, 03:10 PM IST
Farhan- shibani wedding फू बाईss फू; फरहान- शिबानीच्या लग्नात कोणी घातल्या फुगड्या? title=
छाया सौजन्य- सोशल मीडिया

मुंबई : बॉलिवूडमध्ये एकदा का लग्नसराईचे वारे वाहू लागले की, चाहत्यांच्या नजरा आपोआपच इथे वळू लागतात. सध्या याच लग्नसराईच्या वाऱ्यानं वाट धरली होती ती म्हणजे अभिनेता फरहान अख्तर आणि अभिनेत्री, म़ॉडेल शिबानी दांडेकर यांच्या घराची. (farhan Akhtar shibani Dandekar wedding )

काही वर्षांच्या रिलेशनशिपनंतर फरहान आणि शिबानीचा विवाहसोहळा पार पडला. खंडाळा येथे एका फार्महाऊसवर कुटुंबीय आणि काही खास मित्रांच्या उपस्थितीत या जोडीनं सहजीवनाची सुरुवात केली. 

आता शिबानी आणि फरहान या दोघांनीही त्यांच्या लग्नातील काही खास क्षण चाहत्यांच्या भेटीला आणले आहेत. 

अर्थात त्यांनी लग्नाचे फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत. सुरेख कॅप्शन, हसरे चेहरे आणि एका खास दिवसाचा अनुभव घेणारे, वधु- वराच्या वेशातले फरहान आणि शिबानी सर्वांची मनं जिंकत आहेत. 

एकिकडे दोघांचेही कुटुंबीय आनंदात एकरुप होताना दिसत आहेत. तर, दुसरीकडे फरहानच्या Ex wife अधुनापासूनच्या नात्यातील त्याच्या मुली चक्क फुगडी घालताना दिसत आहेत. 

फरहान आणि शिबानी या दोघांनीही कोणत्याही धार्मिक चालीरितीनुसार लग्न केलं नाही. 

पण, तरीही या विवाहसोहळ्य़ात फुगड्यांच्या रुपात मराठी टच मात्र पाहता आला हे खरं. 

नात्याला अखेर मिळालं सहजीवनाचं नाव... 
फरहान आणि शिबानीनं सुरुवातीला त्यांचं नातं गुलदस्त्यात ठेवलं होतं. पण, कालांतराने या जोडीनं खुलेपणानं सर्वांसमक्ष स्वीकारलं. 

एखादं रमणीय ठिकाण म्हणू नका किंवा मग एखादा कार्यक्रम, फरहान आणि शिबानी कायमच एकमेकांची साथ देताना दिसले. 

नात्यात योग्य वळणावर येताच त्यांनी लग्नाचा निर्णय घेत एकमेकांचा आयुष्यभराचे जोडीदार म्हणून स्वीकार केला.