या अभिनेत्रीच्या बाथरूममधून मिळाले लाखो रुपये, अखेर कोर्टात वेश्याव्यवसायाची कबुली

पैसे वाचवण्यासाठी अभिनेत्रीनं असं वक्तव्य केलं असल्याचं सांगितले जात आहे.

Updated: Feb 5, 2022, 07:21 PM IST
या अभिनेत्रीच्या बाथरूममधून मिळाले लाखो रुपये, अखेर कोर्टात वेश्याव्यवसायाची कबुली title=

मुंबई : अशा अनेक अभिनेत्री झाल्या ज्यांनी 80 च्या दशकात बॉलिवूडवर राज्य केलं होतं आणि स्वतःची अशी वेगळी ओळख निर्माण केली होती. तो काळ असा जेव्हा मुली फारशा अभिनेत्री म्हणून पुढे येत नव्हत्या. तसेच पुरुष प्रधान इंडस्ट्रीमध्ये अभिनेत्रींसाठी जागा बनवने फार कठीण होते. परंतु त्या काळात माला सिन्हा यांनी आपली वेगळी जागा निर्माण केली होती. माला सिन्हाच्या चाहत्यांची कमतरता नव्हती, त्यांनी प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं होतं. लोकांना त्यांच्या अभिनयाचे आणि गायनाचे वेडे होते.

परंतु त्यांच्या आयुष्यात अशी एक घटना घडली, ज्यामुळे संपूर्ण फिल्म इंडस्ट्रिच नाही तर तिच्या फॅन्सला ही धक्का बसला. तसेच यामुळे त्यांचे फिल्मी करिअर देखील संपले. या घटनेनंतर माला सिन्हा यांच्याकडे पाहण्याचा लोकांचा दृष्टीकोन देखील बदलला. ज्यानंतर त्यांनी 1966 मध्ये नेपाली एक्टर्स सोबत लग्न केलं.

खरेतर त्यावेळी माला सिन्हा यांच्या घरी इनकम टॅक्सची रेड पडली होती, त्यावेळी तिच्या बाथरूममध्ये 12 लाख रुपये सापडले. त्याकाळी 12 लाख ही फार मोठी रक्कम होती.

इनकम टॅक्स अधिकारी हे पैसे जप्त करण्याबाबत बोलत होते, हे पैसे वाचवण्यासाठी अभिनेत्री माला सिन्हा हिने कोर्टात एक धक्कादायक विधान लिहिले होते, जे ऐकून तिथे उपस्थित असलेले सर्वजण थक्क झाले.

त्यांचे पैसे वाचवण्यासाठी माला सिन्हा यांनी वेश्याव्यवसाय करून हा पैसा कमावल्याचे न्यायालयात सांगितले. जे ऐकून सगळ्यांनाच धक्का बसला.

खरेतर माला सिन्हा यांनी त्यांचे पैसे वाचवण्यासाठी न्यायालयात असे विधान केले होते. असे सांगितले जाते की, माला सिन्हा या फारच कंजूस होत्या. त्या प्रत्येक गोष्टीत पैसा खर्च कसा होणार नाही याबाबत विचार करायच्या. एवढच काय तर त्यांनी आपल्या घरात एकही नोकर ठेवला नाही.

माला सिन्हा यांना स्वप्नांच्या नगरी मुंबईने ओळख दिली. एके दिवशी अचानक माला सिन्हा गुरू दत्तला भेटली. माला सिन्हाचे सौंदर्य पाहून गुरु दत्त यांनी तिला चित्रपटात कास्ट करण्याचा निर्णय घेतला आणि त्यानंतर माला सिन्हाला 1957 मध्ये आलेल्या 'प्यासा' चित्रपटात कास्ट करण्यात आले. गुरु दत्त या चित्रपटाचे निर्माता, दिग्दर्शक आणि अभिनेता होते. हा चित्रपट प्रदर्शित झाला आणि हिट झाला. त्यानंतर माला यांचं फिल्मी करिअर सुरु झालं होतं.

यानंतर त्यांनी 'हॅम्लेट', 'बादशाह', 'रियासत', 'एकादशी', 'रत्न मंजरी', 'झाशी की रानी', 'पैसा ही पैसा' आणि 'एक शोला' या चित्रपटात काम केले.