सिनेनिर्माती एकता कपूर बनली 'अविवाहीत आई'

बाळाच्या जन्मानंतर एकता कपूरवर संपूर्ण बॉलिवूडमधून शुभेच्छांचा वर्षाव

Updated: Jan 31, 2019, 12:34 PM IST
सिनेनिर्माती एकता कपूर बनली 'अविवाहीत आई' title=

मुंबई : ज्येष्ठ अभिनेते जितेंद्र यांची मुलगी आणि सिनेनिर्माती-टेलिव्हिजन प्रोड्युसर एकता कपूर 'सिंगल मदर' बनलीय. सरोगसीद्वारे अविवाहीत एकता एका मुलाची आई बनलीय. या बाळाचा जन्म २७ जानेवारी रोजी झाल्याचं सांगण्यात येतंय. यानंतर एकतावर संपूर्ण बॉलिवूडमधून शुभेच्छांचा वर्षाव होतोय. मुलाची तब्येत व्यवस्थित असून लवकरच त्याला घरी आणण्यात येईल, असं समजतंय.  

याआधी एकताचा भाऊ तुषार कपूरही सरोगसीद्वारे एका बाळाचा बाप बनला होता... त्यानं आपल्या बाळाचं नाव 'लक्ष्य' असं ठेवलंय. 

This cute video of Jeetendra dancing with grandson Laksshay will melt your heart- Watch
जितेंद्र, लक्ष्य आणि तुषार कपूरसोबत

एकतानं याआधीही अनेकदा आपल्याला विवाह करण्याची इच्छा नसल्याचं स्पष्टपणे सांगितलं होतं. जेव्हा आपण एखाद्या बाळाची जबाबदारी घेऊ शकू असा विश्वास वाटेल तेव्हा आई होईन, असंही एकतानं म्हटलं होतं.  

बॉलिवूडमध्ये सरोगसीचं फॅड काही नवीन नाही. याआधी तुषार कपूरशिवाय करण जोहरही यश आणि रुही या दोन जुळ्या मुलांचा बाप बनलाय. बॉलिवूड किंग शाहरुख खानच्या अबराम या लहान मुलाचा जन्मही सरोगसीद्वारेच झालाय.  

एकता कपूर
एकता कपूर यश आणि रुहीसोबत

एकता कपूरनं टीव्ही निर्माती म्हणून आपल्या करिअरला प्रारंभ केला होता. क्योंकी सास भी कभी बहू थी, कहानी घर घर की अशा अनेक कार्यक्रमांची निर्माती असलेल्या एकताला 'टीव्ही क्वीन'ही संबोधलं जातं. सध्या एकता कपूर वेब प्लॅटफॉर्मवर वेबस सीरिजची निर्मिती करतेय.