मलायकाविषयी के.एल.राहुलला असं काही वाटतंय...

कलाविश्वाची किंवा त्यात काम करणाऱ्या कलाकार मंडलींचा अनेकांनाच हेवा वाटतो, त्यांच्याविषयी कुतूहल वाटत राहतं. 

Updated: Jan 6, 2019, 12:39 PM IST
मलायकाविषयी के.एल.राहुलला असं काही वाटतंय...  title=

मुंबई : कलाविश्वाची किंवा त्यात काम करणाऱ्या कलाकार मंडलींचा अनेकांनाच हेवा वाटतो, त्यांच्याविषयी कुतूहल वाटत राहतं. मुख्य म्हणजे यामध्ये फक्त सर्वसामान्य चाहतेच नव्हे, तर क्रीडा विश्वातीलही काही चेहऱ्यांचा समावेश आहे. या चेहऱ्यांमधीलच एक नाव म्हणजे के.एल. राहुलचं. 

अतिशय कमी वेळाच क्रिकेच विश्वात आपली जागा पक्की करणाऱ्या के.एल.ने खऱ्या अर्थाने छोट्या पडद्यावरही पदार्पण केलं आहे. निर्माता- दिग्दर्शक करण जोहर याच्या 'कॉफी विथ करण' या चॅट शोमध्ये त्याने हार्दिक पांड्यासोबत हजेरी लावत करणच्या बऱ्याच प्रश्नांची उत्तरं दिली आहेत. 

ड्रेसिंग रुममध्ये असणाऱ्या वातावरणापासून ते अगदी बॉलिवूडमधील कोणती अभिनेत्री तुमचं क्रश आहे अशा साऱ्या धमाल प्रश्नांची उत्तरं त्या दोघांनीही दिली आहेत. करणच्या याच प्रश्नांची उत्तरं देत राहुलने त्याच्या क्रशच्या नावाचाही उलगडा केला. अभिनेत्री, मॉडेल मलायका अरोरा ही आपली क्रश असल्याचं त्याने स्पष्ट केलं. 

त्याचं हे उत्तर सध्या अनेकांनाच थक्क करुन जात आहे. पण, मैदानात अत्यंत संयमी आणि शांत स्वभावाचा वाटणारा राहुल मैदानाबाहेर मात्र तितकाच खोडकर असल्याचंही या कार्यक्रमात प्रेक्षकांना आणि क्रीडारसिकांना पाहता येणार आहे. 
कॉफी विथ करण या कार्यक्रमात क्रिकेटपटूंनी येत दिलखुलास गप्पा मारण्याची ही पहिलीच वेळ आहे. त्यामुळे मनोरंजनाच्या या खेळपट्टीवर पांड्या आणि राहुलची खेळी प्रेक्षकांच्या पसंतीस उतरणार का, हे पाहणंही तितकच औत्सुक्याचं ठरणार आहे.