रणबीर कपूरच्या 'या' कोरिओग्राफरने केली आत्महत्या

का आली अशी वेळ 

रणबीर कपूरच्या 'या' कोरिओग्राफरने केली आत्महत्या  title=

मुंबई : रणबीर कपूर आणि रणवीर सिंहसोहत काम केलेल्या या बॉलिवूडच्या डान्सरने आत्महत्या केली आहे. अभिजीत शिंदे असं या डान्सरच नाव अभिजीत शिंदे असं आहे. अभिजीतने आपल्या राहत्या घरी पंख्याला गळफास लावून घेतला आहे. गुरूवारी अभिजीतचा मृतदेह घरातील पंख्याला लटकताना दिसला. अभिजीतची सुसाइड नोट देखील लिहिली होती. ज्यामध्ये लिहिलं आहे की त्याच्या बँकेतील सर्व पैसे मुलीच्या नावे करावेत. तर अभिजीतच्या पत्नीने सांगितलं की, गेल्या कित्येक दिवसांपासून तो डिप्रेशनमध्ये होता. 

असं सांगितलं जातं की, पत्नी आणि मुलगी घर सोडून गेल्यामुळे अभिजीत खूप चिंतेत होता. त्याला मुलीला भेटायला देखील दिलं जात नव्हतं. यामुळे तो भरपूर डिप्रेशनमध्ये होता. म्हणून त्याने आत्महत्या सारखं टोकाचं पाऊल उचललं. आपण अनेकदा पाहिलं आहे, सिनेसृष्टीतील मंडळी ताण सहन न झाल्यामुळे आत्महत्येसारखा टोकाचा निर्णय घेतात. या अगोदर नाना पाटेकर यांच्या 'अब तक छप्पन' या सिनेमातून करिअरला सुरूवात केलेल्या असिस्टेंट डायरेक्टर आणि स्क्रिप्ट रविशंकर आलोक यांनी गेल्या महिन्यात इमारतीवरून उडी मारून आत्महत्या केली. अनेक दिवसांपासून काम न मिळाल्यामुळे आत्महत्या केल्याचं समजते. 

तसेच तामिळ इंडस्ट्रीतील लोकप्रिय अभिनेत्री प्रियंकाने देखील फास लावून आत्महत्या केली.