सनी लिओनीने हे काय केलं?

सनीचा असाही अंदाज...

Updated: Aug 1, 2019, 04:57 PM IST
सनी लिओनीने हे काय केलं? title=

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री सनी लिओनी तिच्या आगामी 'कोकोकोला' या हॉरर कॉमेडी चित्रपटासाठी यूपीतील स्थानिक भाषा शिकत आहे. चित्रपटाचे निर्माते महेंद्र धारीवाल नोएडामध्ये 'कोकोकोला'चं शूटिंग करत आहेत. या चित्रपटासाठी सनी अतिशय मेहनत घेत आहे. तिने चित्रपटासाठी तिचा संपूर्ण लूकच बदलला आहे. 

'कोकोकोला'मध्ये सनी साडी नेसलेल्या अतिशय ट्रॅडिशनल लूकमध्ये दिसणार आहे. 

'कोकोकोला' या हॉरर कॉमेडी चित्रपटाशिवाय सनी दाक्षिणात्य चित्रपट 'रंगीला' आणि 'वीरामादेवी'मधूनही प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 

 
 
 
 

A post shared by Sunny Leone (@sunnyleone) on

एका मुलाखतीदरम्यान सनीने, इंडस्ट्रीमध्ये पुढे जाण्यासाठी दाक्षिणात्य चित्रपट निश्चितपणे माझी मदत करतील असं म्हटलं होतं. 

कोणत्याही नवीन गोष्टींविषयी जाणून घेणं मला नेहमीच आवडतं. मला नवीन गोष्टी शिकण्यास अतिशय आनंद होत असल्याचंही तिने म्हटलं होतं. 

 
 
 
 

A post shared by Sunny Leone (@sunnyleone) on

'कोकोकोला' चित्रपटातून सनी पहिल्यांदाच वेगळ्या रुपात पाहायला मिळणार आहे. त्यामुळे आता सनीचा हा 'देसी' अंदाज चाहत्यांच्या किती पसंतीस उतरतो, हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.