Shilpa Shetty च्या आईची पोलिसांत धाव; जाणून घ्या काय आहे प्रकरण

न्यायालयापर्यंत पोहोचलं प्रकरण... 

Updated: Jul 29, 2021, 12:10 PM IST
Shilpa Shetty च्या आईची पोलिसांत धाव; जाणून घ्या काय आहे प्रकरण  title=
संग्रहित छायाचित्र

मुंबई : अभिनेत्री (Shilpa Shetty ) शिल्पा शेट्टी हिच्या आईनं म्हणजेच सुनंदा शेट्टी यांनी पोलिसांत धाव घेतल्याचं वृत्त नुकतंच समोर आलं आहे. शिल्पाची आई, सुनंदा शेट्टी यांनी जुहू पोलिसांमध्ये आपली फसवणूक झाल्याची तक्रार दाखल केली आहे. 

रायगड जिल्ह्यातील कर्जत येथील भूखंड व्यवहार प्रकरणी सुधाकर घारे नावाच्या व्यक्तीच्या नावे त्यांनी ही तक्रार दाखल केली आहे. 

1 कोटी 60 लाख रुपयांची फसवणूक 
शिल्पा शेट्टीच्या आईनं पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार 2019 पासून फेब्रुवारी 2020 च्या दरम्यान, त्यांनी सुधाकर यांच्याशी कर्जतमध्ये एक जमीन व्यवहार केला होता.  त्यावेळी आपली जमीन असल्याचं सांगत त्यानं हा व्यवहार केला होता. ज्यामाध्यमातून त्यांनी सुनंदा यांना जमीन विकली होती. काही काळानंतर सुनंदा यांनी या व्यवहाराची चौकशी केली. त्यावेळी आपण एका राजकीय नेत्याच्या संपर्कात असल्याची माहिती सुधाकर यांनी दिली आणि शिल्पाच्या आईला थेट न्यायालयात जाण्यास सांगितलं. 

राज कुंद्राप्रमाणे शिल्पा शेट्टी 'या' कारणामुळे होती मोठ्या वादात

 

आपली फसवणूक झाल्याचा मुद्दा उचलून धरत शिल्पा शेट्टीच्या आईने न्यायालयाची पायरी चढण्याचा निर्णय घेतला. ज्यानंतर न्यायालयाच्या रितसर आदेशांनंतर पोलिसांनी या प्रकरणी तक्रार दाखल करत पुढील तपास सुरु केला. 

जावई, राज कुंद्रा अडचणीत 
शिल्पा शेट्टीच्या आईपुढे ही अडचण आलेली असतानाच, राज कुंद्रा (RAJ KUNDRA) म्हणजेच शिल्पाचा पतीही अडचणीच सापडला आहे. पॉर्नोग्राफी प्रकरणी राज कुंद्राला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली असून, दर दिवशी या प्रकरणीची नवी माहिती तपासातून समोर येत आहे.