झोपेतून उठताच मिळाला झटका, पाहून शिल्पा शेट्टीच्या मनाचा बांध तुटला

एका फिटनेस सेंटरमध्ये ....

Updated: Nov 15, 2021, 12:43 PM IST
झोपेतून उठताच मिळाला झटका, पाहून शिल्पा शेट्टीच्या मनाचा बांध तुटला title=

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टी (Shilpa Shetty) आणि तिचा व्यावसायिक पती,  राज कुंद्रा (Raj Kundra) यांच्या वाटेवर येणाऱ्या अडचणी काही केल्या कमी होताना नाव घेत नाहीत. आता खुद्द शिल्पानेच तिला धक्का देऊन गेलेल्या एका प्रकरणाचा खुलासा सोशल मीडियाच्या माध्यमातून केला. 

एका फिटनेस सेंटरमध्ये झालेल्या आर्थिक अफरातफरीमध्ये शिल्पा आणि तिच्या पतीचं नाव घेण्यात आलं आहे. 

दाखल करण्यात आलेल्या एफआयआरमध्ये असा आरोप लावण्यात आला आहे की, या जोडीनं भारतातील सर्व गुंतवणूकदारांकडून पैसे घेतले आणि आता जेव्हा 1.5 कोटी रुपयांच्या परतव्याची मागणी झाली तेव्हा मात्र त्यांना धनकावलं असा उल्लेख आहे. 

आपल्याविरोधातील या एफआयआरबाबत अखेर शिल्पाने व्यक्त होत मनातील भावनांना वाट मोकळी करुन आपल्या अधिकारांचं संरक्षण व्हावं अशीच मागणी केली. 

'सकाळी उठल्यानंतर एफआयआरमध्ये माझं आणि राजचं नाव पाहून मला धक्काच बसला. मी हे स्पष्ट करु इच्छिते की, एसएफएल फिटनेस काशिफ खान चालवत होते. याच्या नावे देशभरात जिम खोलण्याचे अधिकारही त्यांच्याकडेच होते', असं शिल्पानं लिहिलं. 

सदर जिमशी संबंधीत सर्व व्यवहार खान पाहत होते, ज्याचा आमच्याशी काहीही संबंध नाही असं म्हणत सर्व फ्रँचायझी काशिफशीच संपर्कात होत्या असं तिनं स्पष्ट केलं. 

मागच्या 28 वर्षांमध्ये आपण फारच मेहनत केली. पण, तरीही आता घडत असणारे प्रतिमा मलिन करण्याचे प्रकार वेदनादायी असल्याचं म्हणत तिनं तीव्र निराशा व्यक्त केली. 

सूत्रांच्या माहितीनुसार नितीन बराई नामक एका तक्रारदारानं वांद्रे पोलिसांना माहिती देत जुलै 2014 पासून आतापर्यंत मेसर्स एसएफएल प्रायवेट कंपनीनं शिल्पा शेट्टी, राज कुंद्रा, काशिफ खान, दर्शित शाह आणि त्यांच्या इतर साथीदारांनी बराई यांच्यासोबत फसवेगिरी केली. 

सदर कंपनीची फ्रँचायझी घेत पुण्याच्या कोरेगाव भागात स्पा आणि जिम सुरु केल्यास फार फायदा होईल असं बराई यांनी पोलिसांना सांगितलं. 

पुढे बराई यांच्याकडून  1 कोटी 59 लाख 27 हज़ार रुपये घेत त्याचा वापर आरोपींनी खासगी कारणांसाठी करण्यात आल्याचं म्हटलं गेलं. पैसे परत मागितल्यास आपल्याला धमकवण्यात आल्याचंही सांगण्यात आलं.