पती कारागृहातून बाहेर येताच कोणाच्या तालावर नाचू लागली शिल्पा?

पाहा या व्हिडीओमध्ये दिसतोय तिचा आनंदी चेहरा आणि दिलखेचक अदा   

Updated: Sep 22, 2021, 01:38 PM IST
पती कारागृहातून बाहेर येताच कोणाच्या तालावर नाचू लागली शिल्पा?  title=
व्हिडीओ स्क्रीनग्रॅब

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टी (Shilpa Shetty) मागच्या बऱ्याच दिवसांपासून चर्चेत आली आहे. शिल्पा चर्चेत येण्यास अनेक कारणं आहेत. त्यापैकी एक कारण म्हणजे तिच्या पतीला, राज कुंद्रा याला पोर्नोग्राफी प्रकरणात झालेली अटक आणि तब्बल दोन महिन्यानंतर आता त्याची करण्यात आलेली सुटका. (Raj Kundra)

पतीची ही प्रकरणं उघडकीस आल्यानंतर शिल्पानं काही काळ माध्यमं आणि सर्व प्रकारच्या कामांपासून दुरावा पत्करला होता. पण, कालांतरानं ती पुन्हा एकदा सक्रिय झालेली दिसली. हल्लीच तिनं 'सुपर डांसर चॅप्टर 4' या रिअॅलिटी शोमध्ये डान्सही केला. 

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या व्हिडीओमध्ये शिल्पा गुलाबी आणि पिवळ्या रंगाच्या छटा असणाऱ्या सुरेख अशा लेहंग्यामध्ये दिसत आहे. व्यासपीठावर ती रॅपर आणि गायक बादशाह याच्या तालावर अर्थात त्याच्या गाण्यावर नातचाना दिसते. 'गेंदा फूल' या गाण्यावर शिल्पानं धरेलेला ठेका आणि तिच्या चेहऱ्यावरते भाव सर्वांच्याच मनाचा ठाव घेताना दिसत आहेत. 

शिल्पानं केलेल्या डान्सचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच गाजतोय. नेटकऱ्यांनी तर या व्हिडीओवर कमेंट करत अनेक प्रश्नही विचारण्यास सुरुवात केली आहे. राजच्या परतण्याच्या आनंदात डान्स..., शिल्पाच्या आनंदाचं नेमकं कारण काय? या एक ना अनेक कमेंट्स नेटकऱ्यांनी केल्या आहेत.