बिग बींना पाहून रेखा अशा काही व्यक्त झाल्या की...

त्याच्या वागण्याने वेधलं अनेकांचं लक्ष 

Updated: Feb 20, 2020, 11:12 AM IST
बिग बींना पाहून रेखा अशा काही व्यक्त झाल्या की... title=
रेखा

मुंबई : चिरतरुण सौंदर्यवती म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अभिनेत्री रेखा यांनी कायमच प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं आहे. 'सलाम-ए-इश्क' म्हणण्यापासून 'इन आँखो की मस्ती' म्हणण्यापर्यंत रेखा यांच्या अदा म्हणजे क्या बात. गेल्या कित्येक वर्षांपासून या सौंदर्यवतीने कायमच अनेक कार्यक्रमांना उपस्थिती लावत प्रत्येक कार्यक्रमात आपली वेगळी छाप सोडली. 

सध्याही रेखा यांनी अशी काही कृती केली आहे जी पाहता सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत. हल्लीच रेखा सेलिब्रिटी छायाचित्रकार डब्बू रत्नानी याने टीपलेल्या छायाचित्रांच्या कॅलेंडर लाँच सोहळ्याला पोहोचल्या होत्या. त्यावेळी अर्थातच त्यांचा अंदाज पाहण्याजोगा होता. या सोहळ्यात रेखा यांनी डब्बू रत्नानीच्या मुलीसोबत रॅम्र वॉकही केला. 

रेखा रॅम्पवॉक करत असतानाच समोर त्यांना बिग बी अमिताभ बच्चन यांचं एक छायाचित्र दिसलं. ज्यानंतर त्यांनी लगेचच हे धोक्याचं क्षेत्रं अर्थात हा 'डेंजर झोन' असल्याचं म्हणत क्षणार्धातच त्या तेथून मागे फिरल्या. रेखा यांनी बिग बींचा फोटो पाहून दिलेली ही प्रतिक्रिया अनेकांसाठीच नवी होती. त्यामुळे अर्थातच अनेकांना धक्का बसला. कित्येकांना या प्रसंगी हसू अनावर झालं. 

शाहरुखच्या 'स्वदेस'मध्ये झळकलेली अभिनेत्री आज एक 'बिझनेस वुमन'

तिशय खेळकर वृत्तीमध्ये रेखा यांची ही प्रतिक्रिया पुन्हा एकदा अमिताभ बच्चन यांच्यासोबतचं नातं पुन्हा एकदा चर्चेत आलं आहे. बॉलिवूडमधील सर्वाधिक चर्चेत असणाऱ्या सेलिब्रिटी जोड्यांमध्ये रेखा आणि बिग बींच्याही नावाचा समोवश होतो. रुपेरी पडद्यावरील त्यांची केमिस्ट्री असो किंवा मग त्यांचं ऑफस्क्रीन नातं. प्रत्येक वेळी या दोघांचा आमनासामना झाला की त्यांच्या नात्यांचा 'सिलसिला' प्रकाशझोतात आल्यावाचून राहत नाही.