प्रियांकाकडे निकचा भलताच आग्रह; पाहा काय करते 'देसी गर्ल'

ही जोडी, वेळोवेळी कपलगोल्स देत असते. 

Updated: Oct 7, 2021, 01:56 PM IST
प्रियांकाकडे निकचा भलताच आग्रह; पाहा काय करते 'देसी गर्ल' title=
छाया सौजन्य- सोशल मीडिया

मुंबई : अभिनेत्री प्रियांका चोप्रा मागील काही वर्षांपासून परदेशातच स्थिरावली आहे. अमेरिकन गायक निक जोनास याच्याशी लग्नगाठ बांधल्यानंतर प्रियांकानं वैवाहिक नात्याची सुरुवात केली. निकला तिनं पावलोपावली साथ दिली. ही जोडी, वेळोवेळी कपलगोल्स देत असते. निकही परदेशी असला तरीसुद्धा त्यानंही कायमच भारतीय संस्कृतीमध्ये रस घेतल्याचं पाहायला मिळालं आहे. 

एकमेकांना साथ देत असतानाच निक म्हणे प्रियांकाकडे कायमच एका गोष्टीसाठी आग्रही दिसतो. एका मुलाखतीमध्ये प्रियांकानं यासंदर्बातील खुलासा केला. हा आग्रह असतो कोणत्याही मोठ्या कामाची सुरुवात करण्याआधी पूजा करण्याचा. 

धार्मिक समजुतींबाबत निक आणि माझ्यामध्य़े बरंच साम्य आहे, असं प्रियांकानं सांगितलं. विविध धर्मांचा या दोघांवर पगडा आहे. पण, दोघंही धार्मिक समजुतींचा कायम आदर करतात. देवाचं रुप असणाऱ्या एखाद्या अंतिम स्थळी पोहोचण्यासाठी धर्म एक माध्यम आहे. त्यामुळं तुमचा कोणावरही विश्वास असो, आपण सारेच एका उच्च शक्तीच्या दिशेनं जात आहोत, माझ्या घरी अनेकदा प्रेअर सेरेमनी होत असते, असं प्रियांका म्हणाली. 

निक कायमच शुभ कार्यापूर्वी किंवा कोणत्याही मोठ्या कामापूर्वी पूजा करण्याचा आग्रह करतो. प्रियांका आणि निकच्या नात्यातील ही बाब अत्यंत लक्षवेधी आणि त्यांच्या नात्याला व्यक्त करणारी अशीच आहे.