'देसी गर्ल'साठी दीपिकाने घेतला मोठा निर्णय

कोणी असं कदाचितच करेल...

Updated: Oct 30, 2018, 10:47 AM IST
'देसी गर्ल'साठी दीपिकाने घेतला मोठा निर्णय title=

मुंबई : सध्याच्या घडीला हिंदी कलाविश्वात चर्चेत असणारा कोणता विषय आहे, असा प्रश्न विचारला असता अनेकजण लगेचच एकच उत्तर देतात. कोणतं बुवा ते उत्तर.... असाच विचार आला ना तुमच्याही मनात? 
संपूर्ण कलाविश्वात सध्या चर्चा सुरु आहे ती म्हणजे अभिनेता रणवीर सिंग आणि दीपिका पदुकोण यांच्या लग्नाची. 

दीपिका आणि रणवीर यांच्याप्रमाणेच बी- टाऊनची 'देसी गर्ल' अभिनेत्री प्रियांका चोप्रासुद्धा अखेर विवाहबंधनात अडकणार आहे. 

अमेरिकन गायक निक जोनास याच्यासोबत प्रियांका सहजीवनाच्य़ा प्रवासाला सुरुवात करणार आहे. 

दीपिका आणि प्रियांका एकमेकींच्या खुप चांगल्या मैत्रिणी. मुख्य म्हणजे असं असलं तरीही आता लग्नाच्या बाबतीत मात्र त्या एकमेकींसमोर उभ्या ठाकल्या आहेत. 

दीपिकाच्या लग्नाच्या निमित्ताने १ डिसेंबरला मुंबईत दिमाखदार सोहळ्याचं आयोजन करत रिसेप्शनचा बेत आखण्यात आला होता. पण, त्याच दिवशी प्रियांकाचं लग्न असल्यामुळे आता दीपिकाने आपल्या रिसेप्शनची तारीख बदलल्याचं कळत आहे. 

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार आता दीपिका आणि रणवीरच्या लग्नाचा रिसेप्शन सोहळा ८ डिसेंबरला पार पडणार आहे. त्यामुळे एका अर्थी पाहुण्यांचा गोंधळ उडणार नाही हे खरं. 

आंतरराष्ट्रीय कलाविश्वात आपलं वेगळं स्थान प्रस्थापित करणारी अभिनेत्री प्रियांका चोप्रा हिचा विवाहसोहळा पारंपरिक पद्धतीने पार पडणार असून, ३० नोव्हेंबरपासून तिच्या लग्नाची धूम पाहायला मिळणार आहे.