'थर्मामीटर तुट गया'; मलायका- नोरा आमनेसामने आल्या आणि... कोणाला पाहायचं तुम्हीच ठरवा

सुरु झालं आगळंवेगळं युद्धं... व्हिडीओ व्हायरल   

Updated: May 10, 2022, 05:59 PM IST
'थर्मामीटर तुट गया'; मलायका- नोरा आमनेसामने आल्या आणि... कोणाला पाहायचं तुम्हीच ठरवा  title=
छाया सौजन्य- सोशल मीडिया

मुंबई : बॉलिवूडमध्ये आजमितीस काही अशाही अभिनेत्री आहेत ज्या त्यांच्या अभिनयापेक्षाही जास्त त्यांच्या नृत्यकौशल्यासाठी ओळखल्या जातात. अशा अभिनेत्रींमध्ये येणारी नावं म्हणजे नोरा फतेही आणि मलायका अरोरा. एकिकडे बेली डान्स आणि घायाळ करणाऱ्या अदांनी काळजावर घाव करणारी नोरा आणि दुसरीकडे गेली कित्येक दशकं आपल्या तालावर सर्वांना थिरकायला भाग पाडणारी मलायका. (Bollywood Actress Nora Fatehi Malaika Arora)

या दोघीही एकाच व्यासपीठावर येऊन नृत्य करु लागल्यास काय होईल, याचा विचार तुम्ही कधी केला आहे का? 

डोक्याला जास्त ताण देण्याची गरज नाही, कारण या दोघींचा आमनासामना अखेर झालाच आहे. एकमेकिंसमोर उभं ठाकल्यानंतर या दोघींनी नेमकं काय केलं, हे या व्हिडीओमध्येच तुम्हाला पाहता येईल. 

जिथं या दोन्ही सौंदर्यवती बेभान नाचताना दिसल्या. नोरानं 'हाय गर्मी' या गाण्यावर ठेका धरला, तर मलायकानं 'मुन्नी बदनाम' गाण्यावर थिरकण्यास सुरुवात केली. नोरा आणि मलायकाची ही जुगलबंदी म्हणजे चाहत्यांसाठी परवणीच... नाही का? 

एका डान्स रिअॅलिटी शोच्या निमित्तानं या दोन्ही अभिनेत्री एकमेकिंसमोर उभ्या ठाकल्या आणि पुढं जे झालं, ते पाहिल्यानंतर तिथं व्यासपीठावर उपस्थित असणारेही भारावले. 

नोराचा तोरा आणि मलायकाची अदा पाहून तुम्हाला सर्वात जास्त कोण भावलं? कमेंटमध्ये कळवा...