'मला वाटलं होतं मी VIP...' नीना गुप्तांना आला वाईट अनुभव, चाहत्यांनी इतक्या प्रेमानं काढली समजूत

Entertainment News : काही चेहरे इतके प्रसिद्ध होतात, वाटेतून जातायेता जरी ती व्यक्ती समोर आली तरीही तिला ओळखणं सहज शक्य होतं. असाच एक चेहरा अभिनेत्री नीना गुप्ता यांचा.   

सायली पाटील | Updated: Oct 5, 2023, 12:31 PM IST
'मला वाटलं होतं मी VIP...' नीना गुप्तांना आला वाईट अनुभव, चाहत्यांनी इतक्या प्रेमानं काढली समजूत title=
Bollywood Actress Neena Gupta denied entry to reserved lounge at Bareilly airport watch video

Neena Gupta Video : गेली कैक दशकं साचेबद्ध कलाकृतींना शह देत आव्हानात्मक भूमिका तितक्याच ताकदीनं साकारण्याचं धाडस करणाऱ्या अभिनेत्री नीना गुप्ता यांनी प्रेक्षकांचं मनोरंजन केलं. किंबहुना आज वयाच्या 64 व्या वर्षीसुद्धा त्या अशाच काही भूमिकांची निवड करताना आणि त्यांची जबाबदारी लिलया पेलताना दिसत आहेत. अशा नीना गुप्ता यांच्या प्रसिद्धीविषयी वेगळं काहीच सांगण्याची गरज नाही. एक समृद्ध अभिनेत्री म्हणून त्यांच्याकडे नवी पिढी पाहते. अनेक ठिकाणी त्यांचं सेलिब्रिटीपण जपलं जातं. किंबहुना त्यांनी आपल्या कलेच्या बळावर मिळवलेला आदर त्यांना मिळतोच. पण, यालाही अपवाद ठरणारी एक घटना नुकतीच घडली आणि या अभिनेत्रीलाही नेमकं कसं व्यक्त व्हावं हेच कळेना. 

नीना गुप्ता यांच्यासोबत घडला विचित्र प्रसंग... 

गेल्या 40 वर्षांहून अधिक काळापासून कलाविश्वाशी नातं जोडलं असून, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पुरस्कारांवर नाव कोरलेलं असूनही आपल्याला आणखी ओळख मिळवण्याची. प्रसिद्धी मिळवण्याची आणि आणखी मेहनत करण्याची गरज असल्याचं त्यांना वाटत आहे. असं का? पाहा त्यांनीच शेअर केलेला व्हिडीओ.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Neena Gupta (@neena_gupta)

गुप्ता यांनी त्यांच्या (Neena Gupta Instagram) इन्स्टाग्राम अकाऊंटवरून एक व्हिडीओ (Viral Video) नुकताच शेअर केला. या व्हिडीओमध्ये त्या विमानतळावर आरक्षित कक्षाबाहेर अर्थात रिझर्व्ह लाऊंजबाहेर असणाऱ्या आसनांवर बसलेल्या दिसत आहे. त्यांनीच सांगितल्यानुसार त्या बरेली विमानतळावर होत्या. इथं आपण एकदा बसलो होतो. पण, आज मात्र मला इथं प्रवेश नाकारण्यात आला. हा लाऊंज VIP साठी असतो असं त्यांना सांगण्यात आलं आणि प्रवेश नाकारला. यावर खोचक प्रतिक्रिया देत, 'मला वाटलं की मी व्हीआयपी आहे. पण, अजून मी VIP झालेले नाही. आता आणखी मेहनत करावी लागणार आहे. व्हीआयपी होण्यासाठी. पण, चांगलंय त्यानिमित्तानं आणखी मेहनतही करायला मिळेल' असं त्या म्हणाल्या. 

चाहत्यांचा संताप... 

इथं नीना गुप्ता यांनी हा व्हिडीओ शेअर करताच चाहत्यांनी बरेली विमानतळावर कार्यरत असणाऱ्या कर्मचाऱ्यांना धारेवर धरण्यास सुरुवात केली. ज्येष्ठ कलाकारांना अशा पद्धतीची वागणूक मिळाल्याबद्दल अनेकांनीच संताप व्यत्त केला. आता बरेली विमानतळ व्यवस्थापनाची यावर काय प्रतिक्रिया येते हे पाहणं महत्त्वाचं असेल. 

दरम्यान, नीना गुप्ता हल्लीच  Charlie Chopra and The Mystery of Solang Valley सीरिजमधून प्रेक्षकांच्या भेटीला आल्या होत्या. इथं त्यांनी नसिरुद्दीन शाह, रत्ना पाठक शाह, विवान शाह, इमाद शाह यांच्यासोबत स्क्रीन शेअर केली होती. लारा दत्ता, गुलशन ग्रोवर, प्रियांशू पेनयुली अशा कलाकारांच्याही इथं महत्त्वाच्या भूमिका पाहायला मिळाल्या होत्या.