मुंबई : अभिनेत्री मलायका अरोरा (Malaika Arora) ही तिच्या बोल्ड अंदाजामुळं कायमच चर्चेत असते. अभिनेत्री, मॉडेल असण्यासोबतच ती काही कार्यक्रमांमध्ये परीक्षकांच्या भूमिकेतही दिसते. एक आई, म्हणूनही ती आपल्या जबाबदाऱ्या अगदी चोखपणे बजावताना दिसते. अशी ही मलायका सध्या तिच्या एका वक्तव्यामुळं चर्चेत आली आहे.
एका कार्यक्रमादरम्यान, मलायकाला अभिनेता मिलिंद सोमण यानं मलायकाला असा प्रश्न विचारला ज्याचं उत्तर देत तिनं भल्याच अपेक्षा व्यक्त केल्या. अशा कोणत्या तीन गोष्टी आहेत, ज्या तुला पुरुषांकडे आकर्षित करतात?
अभिनेता अर्जुन कपूर याच्यासह रिलेशनशिपमध्ये असणाऱ्या मलायकानं यावेळी सांगितलं, 'मला खरंतर असा मुलगा आवडतो जो वयाच्या मागेपुढं असेल. मला तो आवडेल... सुंदर नसेल तरी ठीक. पण, अतिशय फ्लर्ट करणारा हवा. मला असा मुलगा आवडेल जो चांगल्या पद्धतीनं किस करु शकेल.' मलायकाच्या या अटी पाहून आता अर्जुन यावर काय प्रतिक्रिया देतो हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. इतकंच नव्हे, तर मलायकानं अर्जुनला निवडलं आहे, त्यामुळं तो तिच्या या अपेक्षा पूर्ण करतच असेल असे तर्कही चाहत्यांनी लावले आहेत.
कार्यक्रमादरम्यान, मलायकाला तू अर्जुनला शेवटी कोणता मेसेज पाठवलास असं विचारलं असता आय लव्ह यु टू, असं उत्तर तिनं दिलं. 2019 पासून अर्जुन आणि मलायका रिलेशनशिपमध्ये असल्यातं पाहायला मिळत असून, वेळोवेळी ही जोडी चाहत्यांना भारावून सोडत आहे.
वय आणि कुटुंबामध्ये असणआरी गणितं झुगारत अर्जुन आणि मलायका कायमच एकमेकांना साथ देताना दिसतात. त्यांची ही केमिस्ट्री पाहता ते आता या नात्याला नवं वळण कधी देतात अर्थात लग्न कधी करतात हाच प्रश्न चाहत्यांकडून उपस्थित केला जात आहे.