अर्जुनसाठी मलायकाची पोस्ट; म्हणाली...

माध्यमांसमोर आपल्या नात्याची ग्वाही दिल्यानंतर मलायका अरोरा आणि अर्जुन कपूर यांनी त्यांचं नातं आता एका वेगळ्या वळणावर नेलं आहे. 

Updated: Jul 4, 2019, 11:23 AM IST
अर्जुनसाठी मलायकाची पोस्ट; म्हणाली...  title=

मुंबई : माध्यमांसमोर आपल्या नात्याची ग्वाही दिल्यानंतर मलायका अरोरा आणि अर्जुन कपूर यांनी त्यांचं नातं आता एका वेगळ्या वळणावर नेलं आहे. अर्जुनच्या वाढदिवसाच्या निमित्ताने ही जोडी न्यूयॉर्कमध्ये सुट्टीसाठी गेली होती. एकमेकांसोबत काही खास क्षण व्यतीत करणारी ही सेलिब्रिटी जोडी आता सोशल मीडियाच्या माध्यमातूनही त्यांच्या या नात्याची अधिक सुरेख आणि हेवा वाटेल अशीच मागणी करत आहेत. 

अर्जुनच्या वाढदिवसाच्या निमित्ताने मलायकाने त्याच्यासोबतचा फोटो पोस्ट करत सर्वांचं लक्ष वेधलं. त्यामागोमागच तिने इन्स्टा स्टोरीतही त्याच्यासोबतच्या नात्याला मांडणाऱ्या काही ओळी पोस्ट करत यामध्ये त्याला टॅगही केलं. 

खुल्लम खुल्ला प्यार करेंगे हम दोनो याच अंदाजात चाहत्यांचं लक्ष वेधणारी ही जोडी इतक्यावरच थांबली नाही. तर, पुढे त्यांनी ट्विनिंग करत म्हणजेच जवळपास एकसाकरखे कपडे घालत आकर्षक कॅप्शनच्या साथीने हे फोटोही सोशल मीडियावर पोस्ट केले. निऑन रंगाचे कपडे आणि डोक्यावर कॅप असा या दोघांचाही लूक सध्या चित्रपट वर्तुळात अनोख्या #CoupleGoals प्रकाशझोतात आहे.

 
 
 
 

A post shared by Malaika Arora (@malaikaaroraofficial) on

 
 
 
 

A post shared by Arjun Kapoor (@arjunkapoor) on

मलायका आणि अर्जुन त्यांच्या  नात्याविषयी गेल्या काही दिवसांपासून अधिक स्पष्ट आणि तितक्याच आत्मविश्वासाने बोलत आहेत. आपल्या मुलालाही या नात्याने कोणतीच अडचण नसल्याचं तिने नुकतच एका मुलाखतीत स्पष्ट केलं होतं. त्यामुळे येत्या काळात ते लग्नाचा निर्णय घेणार का, हे पाहणंही तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे.