दयाबेनच्या ऐवजी झळकणार 'हा' चेहरा? उत्सुकता कायम

अभिनेत्री दिशा वकानीने अखेर मालिकेला राम-राम ठोकला आहे.

Updated: Jul 4, 2019, 10:48 AM IST
दयाबेनच्या ऐवजी झळकणार 'हा' चेहरा? उत्सुकता कायम title=

मुंबई : 'तारक मेहता का उलटा चष्मा' या मालिकेच्या माध्यमातून घरा-घरात पोहोचलेल्या अभिनेत्री दिशा वकानीने अखेर मालिकेला राम-राम ठोकला आहे. 'दयाबेन' या भूमिकेने चाहत्यांच्या मनात घर केले होते. अगदी लहान मुलांपासून ते वृद्धांच्या मनात अधिराज्य गाजवणारी दयाबेन म्हणजेच दिशा आता मालिकेत आपली भूमिका साकारणार नाही. मालिकेत आता दिशाची जागा कोणती अभिनेत्री घेणार याकडे सर्व चाहत्यांचे लक्ष लागले आहे.
 
सूत्रांच्या माहितीनुसार, 'बडे अच्छे हैं' आणि 'हमने ली शपथ' या मालिकांच्या माध्यमातून प्रकाशझोतात आलेली अभिनेत्री विभूती शर्मा दयाबेनची भूमिका साकारण्यासाठी सज्ज झाली आहे. तिने या भूमिकेसाठी ऑडिशन सुद्धा दिले आहे. त्यामुळे 'दयाबेन'च्या भूमिकेसाठी तिची निवड केली जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

पण चाहत्यांना अद्यापही दयाबेनची प्रतिक्षा करावी लागणार आहे. मालिका निर्मात्यांनी दयाबेनच्या भूमिकेबद्दल कोणत्याही प्रकारची अधिकृत घोषणा केलेली नाही. दयाबेन हे पात्र पुन्हा मालिकेत उतरवण्यास निर्माते घाई करणार नसल्याचे समजत आहे. अद्यापही आम्ही दयाबेनच्या भूमिकेला योग्य न्याय देणाऱ्या कलाकाराच्या शोधात असल्याचे निर्मात्यांनी स्पष्ट केले.