संदीप वांगा रेड्डी दिग्दर्शित 'अॅनिमल' (Animal) हा चित्रपट गेल्या काही दिवसांपासून सातत्याने चर्चेत आहे. या चित्रपटाने बॉक्स ऑफिवसर तगडी कमाई केली होती. या चित्रपटातील अॅक्शन सीन आणि इंटिमेट सीन चांगलेच गाजले. या चित्रपटात रणबीर कपूर, रश्मिका मंदाना आणि तृप्ती डिमरी हे कलाकार प्रमुख भूमिकेत झळकत आहेत. आता या चित्रपटाबद्दल अभिनेत्री कोंकणा सेनने प्रतिक्रिया दिली आहे.
'अॅनिमल' या चित्रपटाची काही जण स्तुती करताना दिसत आहेत. तर काहीजण या चित्रपटावर टीका करताना दिसत आहेत. सध्या अभिनेत्री कोंकणा सेन ही 'किलर सूप' या तिच्या वेबसीरिजमुळे चर्चेत आहे. सध्या ती या वेबसीरिजचे प्रमोशन करताना दिसत आहे. आता एएनआयला दिलेल्या मुलाखतीदरम्यान कोंकणा सेनने अॅनिमल या चित्रपटाबद्दल भाष्य केले. यावेळी तिने या चित्रपटातील इंटीमेट आणि अॅक्शन सीन असलेल्या दृश्यांवर संताप व्यक्त केला आहे.
यावेळी कोंकणा सेन म्हणाली, "मला वैयक्तिकरित्या पडद्यावर हिंसा पाहण्यात कोणतीही अडचण नाही. पण या हिंसाचारामागे काहीतरी ठोस कारण असायला हवं. तसेच सेक्स सीन पाहायलाही माझी हरकत नाही. पण फक्त एवढ्याशा गोष्टीसाठी मी कोणताही चित्रपट पाहू शकत नाही. एखाद्या चित्रपटात हिंसाचार किंवा सेक्सचा सीन असण्यामागे काहीतरी ठोस कारण असायला हवं. यातील तो सीन पात्रांना जोडतो, कथानकाला जोडणारा हवा. या दृश्यामागे दिग्दर्शकाला काय दाखवायचे आहे, हे त्याला नीट सांगता यायला हवं."
"मी अॅनिमल चित्रपट पाहिला नाही, कारण मला तो माझ्या आवडीचा चित्रपट वाटला नाही. तसेच मला या चित्रपटाचे रिव्ह्यूही तसेच वाटले. या चित्रपटात नात्यात हिंसा दाखवण्यात आली आहे आणि मला तो पाहायला नाही. मी त्याचा टार्गेट ऑडियन्स नाही", असेही कोंकणा सेनने म्हटले.
दरम्यान रणबीर कपूरच्या बहुचर्चित ‘अॅनिमल’ चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर 900 कोटींहून अधिकचा गल्ला जमावला होता. या चित्रपटात रणबीर कपूर, अनिल कपूर, बॉबी देओल, रश्मिका, तृप्ती डिमरी या कलाकारांनी मुख्य भूमिका साकारल्या आहेत. या चित्रपटात मुख्य अभिनेत्यांप्रमाणे मराठी अभिनेते उपेंद्र लिमये यांची प्रचंड चर्चा रंगली. या चित्रपटाचे दिग्दर्शन संदीप रेड्डी वांगा यांनी केले होते. सध्या कोंकणा ही 'किलर सूप' या वेबसीरिजमुळे चर्चेत आहे. यात मनोज बाजपेयी आणि कोंकणा हे झळकणार आहेत. त्यासोबतच कोंकणा ही 'लस्ट स्टोरीज 2' या चित्रपटातही झळकली आहे. तिचा हा चित्रपट चांगला गाजला होता.