स्वत:ला महिलेच्या रुपात पाहत नाही, अभिनेत्री; एका मुलाची आई असतानाही ही कसली जाणीव ?

स्त्रीत्वासंबंधी तिनं केलेल्या वक्तव्यानं सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत

Updated: Mar 24, 2022, 10:07 AM IST
स्वत:ला महिलेच्या रुपात पाहत नाही, अभिनेत्री; एका मुलाची आई असतानाही ही कसली जाणीव ?  title=
छाया सौजन्य- सोशल मीडिया

मुंबई : हिंदी चित्रपट विश्वामध्ये कलाकार आणि त्यांच्या चित्रपटांसमवेत आणखी एका गोष्टीची विशेष चर्चा होते. ही चर्चा असते त्या कलाकारांच्या खासगी आयुष्याची, त्यांनी मांडलेल्या भूमिकांची. सध्या अशातच एका अभिनेत्रीचं नाव समोर येत आहे. आपल्या स्त्रीत्वासंबंधी तिनं केलेल्या वक्तव्यानं सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत.

मी स्वत:ला महिलेच्य नजरेतून पाहत नाही, असं म्हणणारी ही अभिनेत्री आहे कोंकणा सेन शर्मा. आपण लिंगभेदाकडे झुकत नसल्याचं ती म्हणते. शिवाय स्वत: Androgyny असल्याचंही म्हणते. ही एक अशी संज्ञा आहे ज्यामध्ये महिला आणि पुरुषांना विशेष हक्क आहेत. (Konkona sen sharma)

कोंकणा म्हणते, ‘मी स्वत:कडे एक महिला म्हणून पाहत नाही. मी कायमच तटस्थ भूमिकेत असते. लिंग ही एक शिकवलेली संकल्पना आहे आणि मी त्याच्याशी स्वत:ला जोडू पाहत नाही.

किंबहुना एखाद्या चित्रपटामध्ये मला स्त्रीवादी भूमिका साकारायची असेल तर मला ते कसं साकारावं हे शिकून घ्यावं लागतं. महिला, पुरष किंवा मध्येच काहीतरी असण्याची कोणती एक पद्धत नाही. मी कायम Androgyny म्हणऊन माझ्याकडे पाहिलंय’.

लग्नाआधीच गरोदर असण्याच्या चर्चांमध्येच कोंकणानं काही वर्षांपूर्वी एका मुलाला जन्म दिला. त्यालाही ती स्वच्छंदी विचार करायला शिकवत आहे. कोंकणणानं अभिनेता रणवीर शौरी याच्यशी लग्न केलं होतं. काही वर्षांच्या संसारानंतर त्यांच्यातील वैवाहिक नात्याला तडा गेला होता.

By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.

x