लग्नानंतर अवघ्या 3 महिन्यातच विकी-कतरिना चढले कोर्टाची पायरी

लग्नानंतर लगेचच,हे जोडपे हनिमूनसाठी रवाना झाले.

Updated: Mar 23, 2022, 07:59 PM IST
लग्नानंतर अवघ्या 3 महिन्यातच विकी-कतरिना चढले कोर्टाची पायरी title=

मुंबई :  विकी कौशल आणि कतरिना कैफ यांनी 9 डिसेंबर 2021 रोजी पारंपारिक पद्धतीने लग्न केले. राजस्थानमधील सवाई माधोपूर येथील सिक्स सेन्स फोर्ट बरवाडा येथे दोघांचे लग्न पार पडले.

लग्नानंतर लगेचच,हे जोडपे हनिमूनसाठी रवाना झाले.मुंबईला परत येत कामाला देखील दोघांनी सुरुवात केली. शूटिंगमध्ये दोघेही व्यस्त झाले.

विकी आणि कतरिनाचे लग्न होऊन आता 3 महिन्यांहून अधिक काळ लोटला आहे. पण कायदेशीर पद्धतीने ते काही दिवसांपूर्वी पती-पत्नी झाले आहेत. लग्नाच्या तीन महिन्यांनंतर
या जोडप्याने अखेर लग्नाची नोंदणी केली.

 19 मार्च रोजी, विकी कौशल आणि कतरिना कैफ कोर्टात पोहोचले. दोन्ही कुटुंबांच्या उपस्थितीत विवाह नोंदणीची प्रक्रिया पूर्ण झाली. त्याच रात्री, विवाह नोंदणीनंतर, ही संपुर्ण फॅमिली रेस्टॉरंटमध्ये आनंद साजरा करताना दिसली. ज्याचे व्हिडिओ देखील खूपच व्हायरल झाले.