Kiara Advani ला कथित प्रियकराकडून खास शुभेच्छा; Birthday पार्टीत धमाल

लक्ष वेधलं ते म्हणजे कियाराच्या कथित प्रियकरानं दिलेल्या शुभेच्छांनी. 

Updated: Jul 31, 2021, 07:56 PM IST
Kiara Advani ला कथित प्रियकराकडून खास शुभेच्छा; Birthday पार्टीत धमाल  title=
छाया सौजन्य- सोशल मीडिया

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री कियारा अडवाणी (Kiara Advani ) हिला वाढदिवसानिमित्तानं संपूर्ण चित्रपट जगतातून शुभेच्छा देण्यात आल्या. कलाकार मंडळींनी या अभिनेत्रीला खास अंदाजात शुभेच्छा दिल्याचं पाहायला मिळालं. यामध्ये लक्ष वेधलं ते म्हणजे कियाराच्या कथित प्रियकरानं दिलेल्या शुभेच्छांनी. 

मागील बऱ्याच दिवसांपासून कियाराचं नाव एका अभिनेत्याशी जोडलं जात आहे. विमानतळ, एखादा कार्यक्रम किंवा मग पार्टी अशा ठिकाणी हा अभिनेता कियारासोबत दिसला आहे. यामुळं त्यांच्या प्रेमप्रकरणाच्या चर्चांनी आणखीनच जोर धरला आहे. यातच त्यानं कियाराला दिलेल्या शुभेच्छा आणि तिचं त्यावर व्यक्त होणंही चाहत्यांचं लक्ष वेधलं आहे. 

कियारासोबत नाव जोडलं जाणारा तो अभिनेता आहे सिद्धार्थ मल्होत्रा (siddharth malhotra). येत्या काळात ही जोडी 'शेरशाह' या चित्रपटातून स्क्रीन शेअर करताना दिसणार आहे. त्याचाच संदर्भ देत सिद्धार्थनं कियाराला शुभेच्छा देत एक सुरेख फोटो पोस्ट केला. त्यामध्ये त्यानं लिहिलं, 'वाढदिवसाच्या शुभेच्छा की. तुझ्यासोबत शेरशाहचा प्रवास अदभूत होता. खूप साऱ्या आठवणी आहेत. अशीच राहा... खूप सारं प्रेम... हॅप्पी बर्थडे कियारा'. सिद्धार्थच्या या शुभेच्छांवर व्यक्त होत, 'थँक्यू कॅप्टन', असं लिहित तिनं त्याचे आभार मानले. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by KIARA (@kiaraaliaadvani)

वाढदिवसाच्या पार्टीसाठी खास केक 
तिथं कियारानं तिच्या वाढदिवसानिमित्त एक खास केक कापला. इन्स्टाग्रामवर तिनं एक व्हिडीओ शेअर केला. ज्यामध्ये या केकचीही झलक पाहायला मिळत आहे. केक, त्यासोबत असणारे फोटो आणि खुप सारे फुगे पाहून कियारा एखाद्या लहान मुलाप्रमाणेच आनंदात दिसत आहे. हा व्हिडीओ पाहता वाढदिवसाच्या पार्टीमध्ये कियारानं एकच धमाल केल्याचं स्पष्टपणे दिसत आहे.