Shocking! कतरिनानं तब्बल 6 वेळा लग्नमंडपातून काढला पळ; पाहा केव्हा घडलं हे सारं

लग्नमंडपापर्यंत पोहोचण्याची कतरिनाची ही पहिलीच वेळ नाहीये.   

Updated: Nov 18, 2021, 11:09 AM IST
Shocking! कतरिनानं तब्बल 6 वेळा लग्नमंडपातून काढला पळ; पाहा केव्हा घडलं हे सारं title=
छाया सौजन्य- सोशल मीडिया

मुंबई : अभिनेत्री कतरिना कैफ येत्या काही दिवसांमध्येच बॉलिवूडमधील एका अतिशय लोकप्रिय अभिनेत्याशी लग्नगाठ बांधणार आहे. 'उरी' फेम विकी कौशल याच्याशी कतरिना लग्न करणार असल्याच्या चर्चांनी आता कमालीचा जोर धरला आहे. (Katrina Kaif Vicky kaushal)

इतकंच काय, तर जयपूरमध्ये एका अतिशय नयनरम्य ठिकाणी या जोडीच्या लग्नाची तयारीही सुरु असल्याचं म्हटलं जात आहे.

पण, तुम्हाला माहितीये का, लग्नमंडपापर्यंत पोहोचण्याची कतरिनाची ही पहिलीच वेळ नाहीये. 

याआधी तब्बल 6 वेळा तिनं लग्नमंडपातून पळ काढला आहे. 

बसला ना, धक्का? प्रत्यक्ष आयुष्यात लग्न करण्यास सज्ज असणाऱ्या कतरिनासोबत हे सारं नेमकं केव्हा घडलं हाच प्रश्न तुम्हालाही पडतोय ना? 

तर, हे सारं घडलं तिनं साकारलेल्या चित्रपटांमध्ये. 'नमस्ते लंडन' या चित्रपटाच्या निमित्तानं कतरिना लग्नमंडपातून पळून अखेर खिलाडी कुमारशी पुन्हा लग्न करते असं दाखवण्यात आलं होतं.

'सिंग इज किंग', 'मेरे ब्रदर की दुल्हन' या चित्रपटांमध्येही तिनं लग्नमंडपातून पळ काढला आहे. आठवतंय का काही? 

फिल्मों में 6 बार अपनी शादी का मंडप छोड़ फरार हो चुकी हैं Katrina Kaif

इतकंच काय, तर 'मैने प्यार क्यो किया?' आणि 'अजब प्रेम की गजब कहानी' या चित्रपटांमध्येही कॅटनं विवाहमंडपातून पळ काढल्याचं पाहायला मिळालं आहे. 

कतरिनाचा हा अंदाज पाहता, आता विकी कौशलची ही 'रनवे ब्राईड' तिच्या खऱ्याखुऱ्या लग्नात काय वेगळं करते याचीच उत्सुकता चाहत्यांना लागून राहिली आहे.