VIDEO : लग्नाविषयीच्या प्रश्नावर कतरिनाने असं काही उत्तर दिलं की...

कतरिना म्हणते.... 

Updated: Feb 12, 2019, 12:59 PM IST
VIDEO : लग्नाविषयीच्या प्रश्नावर कतरिनाने असं काही उत्तर दिलं की...  title=

मुंबई : २०१८ या वर्षाच्या सुरुवातीपासून ते अगदी शेवटपर्यंत संपूर्ण कलाविश्वात लग्नसराईचे वारे वाहात होते. किंबहुना त्या वर्षाच्या आधी म्हणजे अभिनेत्री अनुष्का शर्मा आणि विराट कोहली यांच्या विवाहसोहळ्यानंतचर सध्याच्या घडीला आघाडीवर असणाऱ्या अभिनेत्रींनीही लग्नगाठ बांधत एका नव्या प्रवासाला सुरुवात केली. सोनम कपूर, प्रियांका चोप्रा, दीपिका पदुकोण ही त्यापैकीच काही अभिनेत्रींची नावं. आपल्यासोबतच्या या अभिनेत्री त्यांच्या खासगी आयुष्यात नव्या वाटेवर निघत असतानात कतरिना कैफ मात्र तिच्या आगामी चित्रपटांमध्येच व्यग्र असल्याचं पाहायला मिळत आहे. याच एकंदर परिस्थितीविषयी आणि अर्थातच लग्नाविषयी प्रश्न विचारला असता तिने एका मुलाखतीत असं काही उत्तर दिलं की विचारून सोय नाही. 

'फेमसली फिल्मफेअर' या वेब शो स्वरुपातील कार्यक्रमात मुलाखतीदरम्यान तिला याविषयीचा प्रश्न विचारण्यात आला. आपल्यासोबतच्या अभिनेत्रींची लग्न होत असल्याचं पाहून एकटं पडत असल्याची भावना येत असल्याचं ती हसत म्हणाली. 'सगळ्यांच लग्न करत आहेत..... अरे कोणीतरी थांबा माझ्यासाठी, मला एकटीला मागे ठेवू नका', असं ती मोठ्या विनोदी आणि खोडकर अंदाजात म्हणाली. आता तिची ही हाक कोणी ऐकली की नाही हासुद्धा एक महत्त्वाचा प्रश्न. 

दरम्यान, कतरिनाच्या खासगी आयुष्याविषयी सांगावं तर तिचं नाव काही कलाकारांशी जोडलं गेलं होतं. रणबीर कपूर आणि सलमान खान ही त्यापैकीच काही महत्त्वाची नावं. रणबीर आणि कतरिनाचं नातं हे सर्वज्ञात होतं. किंबहुना काही काळ ते दोघं लिव्ह इन रिलेशनशिपमध्येही होते. पण, पुढे या नात्यात दुरावा आला आणि त्यांच्या वाटा वेगळ्या झाल्या. 'दबंग खान' म्हणून ओळखल्या जाणाऱ्य़ा अभिनेता सलमान खान यालाही ती डेट करत असल्याचं म्हटलं गेलं. सलमानच्या कौटुंबीक सोहळ्यांपासून ते त्याच्यासोबत चित्रपटात स्क्रीन शेअर करण्यापर्यंत अनेकदा या दोघांचा सहज वावर बऱ्याच चर्चांना वाव देतं. पण, तरीही बी टाऊनची ही अभिनेत्री तिच्या खासगी आयुष्यातील बऱ्याच गोष्टी माध्यमांपासून आणि इतरांपासूनही दूर ठेवण्यालाच प्राधान्य देते.