धक्कादायक! प्रेमाचं प्रपोजल नाकारल्यानं अभिनेत्रीच्या बहिणीवर Accid Attack

एका आघाडीच्या बॉलिवूड अभिनेत्रीच्या बहिणीसोबतही असंच घडलं.   

Updated: Jun 1, 2022, 09:17 AM IST
धक्कादायक! प्रेमाचं प्रपोजल नाकारल्यानं अभिनेत्रीच्या बहिणीवर Accid Attack  title=
छाया सौजन्य- सोशल मीडिया

मुंबई : कलाकार आणि त्यांच्या कुटुंबीयांची आयुष्य पाहिल्यानंतर सर्वांनाच त्यांच्या जगण्याचा हेवा वाटतो. पण, मुळात त्यांच्या या जगण्यातही काही अशा गोष्टी असतात, ज्या कानावर येताच आपला थरकाप उडतो. एका आघाडीच्या बॉलिवूड अभिनेत्रीच्या बहिणीसोबतही असंच घडलं.  

जीवनात घडलेल्या 'त्या' एका प्रसंगानंतर तिच्यासाठी सर्वकाही बदललं होतं. मुळात तिला यातून सावरण्यासाठीच प्रचंड वेळ गेला होता. कारण, तिच्यावर अॅसिड हल्ला झाला होता. 

अॅसिड हल्ल्यातून बचावर पुन्हा स्वत:च्या पायावर उभी राहणारी ही महिला म्हणजे अभिनेत्री कंगना रानौत हिची बहिण रंगोली चंदेल. (Bollywood Actress kangana ranaut sister rangoli acid attack surviver)

काही वर्षांपूर्वी रंगोलीनं सोशल मीडियाच्या माध्यमातून खुद्द रंगोलीनंच याबाबतचा खुलासा केला होता. आता मात्र तिचं हे ट्विट उपलब्ध नाही. त्यावेळी महाविद्यालयीन दिवसांमधील एक फोटो शेअर करत, तो फोटो काढल्यानंतरच आपल्यावर ऍसिड हल्ला झाल्याचं तिने सांगितलं होतं. 

'हा फोटो काढल्यानंतर काही वेळानेच ज्या मुलाचं प्रेमाचं प्रपोजल मी नाकारलं होतं, त्याने एक लीटर ऍसिड माझ्या चेहऱ्यावर फेकलं होतं. माझ्यावर जवळपास ५४ शस्त्रक्रिया झाल्या. त्याचवेळी माझ्या लहान बहिणीची छेड काढत तिला जीव जाईपर्यंत बेदम मारहाण करण्यात आली होती..... का....?, असा प्रश्न तिने उपस्थित केला होता. 

Kangana Ranaut, sister Rangoli Chandel summoned by Mumbai police again over  'objectionable comments' on social media | People News | Zee News

आपल्याच प्रश्नाचं उत्तर देत तिनं लिहिलेलं, मुलींना आजही चांगली वागणूक दिली जात नाही, तेव्हा आता या क्रूरतेशी लढा देण्याची वेळ आली आहे, निदान आपल्या मुलांच्या सुरक्षिततेसाठी हे होणं गरजेचं असल्याचं ती म्हणाली. 

आपलं सौंदर्य हरपल्याचं अनेकांना दु:ख झाल्याचं सांगत रंगोलीने तिच्या मनातल्या वेदना सर्वांसमोर ठेवल्या. आपले अवयव डोळ्यांसमोर वितळत होते, ५४ शस्त्रक्रियांनंतरही रंगोलीचा कान डॉक्टर नीट करु शकले नाहीत. हेच वास्तव मांडत मुलाच्या जन्मानंतर त्याला स्तनपान करतेवेळी इजा पोहोचलेल्या शरीराच्या त्या भागातील वेदना आणि अडचणींची जाणीव झाली, असं तिने स्पष्ट केलं होतं.