कधीपर्यंत रडत राहशील ? कंगनाचा हृतिकला प्रश्न

. चार वर्षानंतर कंगनाच्या केसचा पुन्हा तपास होणार 

Updated: Dec 15, 2020, 09:18 AM IST
कधीपर्यंत रडत राहशील ? कंगनाचा हृतिकला प्रश्न  title=

मुंबई : मुंबईला पाकव्याप्त काश्मीर म्हणण्यापासून शेतकरी आंदोलनाबाबत वादग्रस्त विधान करणारी अभिनेत्री कंगना राणौत (Kangana Ranaut) सध्या चर्चेत आहे. आता ती आणखी एका वादात अडकताना दिसतेय. बॉलिवूड अभिनेता हृतिक रोशन (Hritik Roshan) आणि कंगना राणौतशी संबंधित प्रकरण आता पुन्हा उघडलं गेलंय.  कंगना-ह्रतिक केस मुंबई क्राईम ब्रँचकडे देण्यात आली आहे. ही केस मुंबई पोलिसांच्या सायबर सेलकडं होती. आता तिचा तपास क्राईम ब्रँचकडे (Crime Branch) देण्यात आला आहे. चार वर्षानंतर कंगनाच्या केसचा पुन्हा तपास होणार आहे. ह्रतिकनं केलेल्या तक्रारीची फाईल ओपन झाली आहे. 

हृतिक रोशनला २०१३ ते २०१४ दरम्यान १०० ईमेल मिळाले होते. कंगना राणौतच्या ईमेल आयडीवरुन हे ईमेल आले होते. हृतिकने २३ मे २०१६ रोजी सायबर पोलीस स्टेशनला तक्रार केली होती.माझा ईमेल आयडी हॅक झाला होता असे स्पष्टीकरण कंगनाने यावर दिलं होतं. मी कोणताच ईमेल हृतिक रोशनला केला नसल्याचं तिने म्हटलं होतं. 

क्राईम बँचचे इंटिलिजन्स युनिट आता या प्रकरणाची चौकशी करणार आहे.ह्रतिकनं २०१७ साली या प्रकरणाची सगळी कागदपत्रं सायबर पोलीस स्टेशनला दिली होती. तरीही या प्रकरणाचा तपास योग्य पद्धतीनं झाला नाही असा दावा ह्रतिकच्या पक्षाकडून करण्यात आलाय. ह्रतिक या संदर्भात बड्या पोलीस अधिकाऱ्यांना भेटला होता असा दावा केला जात आहे.

कंगना म्हणते...

त्याची कहाणी आता पुन्हा सुरु झालीय. आमचा ब्रेकअप आणि त्याच्या घटस्फोटाला आता खूप वर्ष झाली. पण त्याला त्या पुढे जायच नाही. कोणत्याही महिलेला तो डेट करत नाहीय. माझ्या वैयक्तिक आयुष्यात काहीतरी करण्यासाठी मी धैर्य करते पण तो तेच नाटक सुरु करतो. एका छोट्याश्या अफेयरसाठी हृतिक रोशन कधीपर्यंत रडणार ? असा प्रश्न कंगनाने विचारलाय.