हाय रामा ये क्या हुआ; राम गोपाल वर्मांचं अभिनेत्रीच्या पायाशी लोळण , पाहा व्हिडीओ

कधी एखादं ट्विट, कधी एखादा व्हिडीओ नाहीतर मग कधी उगाचच केलेली बडबड

Updated: Sep 1, 2021, 09:18 PM IST
हाय रामा ये क्या हुआ; राम गोपाल वर्मांचं अभिनेत्रीच्या पायाशी लोळण , पाहा व्हिडीओ  title=
व्हिडीओ स्क्रीनग्रॅब

मुंबई : बॉलीवुड (Bollywood) मध्ये नावाजलेल्या दिग्दर्शक राम गोपाल वर्मा यांच्या नावाती चर्चा चित्रपटांमुळे कमी आणि इतर कारणांसाठी जास्त अशीच परिस्थिती मागच्या काही दिवसांपासून पाहायला मिळत आहे. 

कधी एखादं ट्विट, कधी एखादा व्हिडीओ नाहीतर मग कधी उगाचच केलेली बडबड. त्यांना चर्चेत यायला अगदी लहानसं कारणंही पुरेसं होतं. सध्या राम गोपाल वर्मा पुन्हा एकदा चर्चेचा विषय ठरण्याला काही व्हिडीओ कारणीभूत ठरत आहेत. 

ती तिथे तो.... का अस्वलासोबतच राहते ही सुंदर मुलगी? 

 

एका अभिनेत्री, मॉडेलच्या वाढदिवसाचे हे व्हिडीओ असल्याचं म्हटलं जात आहे. जिथं 'हाय रामा ये क्या हुँआ' या गाण्यावर ते इनाया सुलताना नामक अभिनेत्रीच्या साथीनं डान्स करत आहेत. इनायाचा हात धरणाऱ्या, तिच्या मागेपुढे करणाऱ्या आणि चक्क तिच्या पायाशी लोळण घालणाऱ्या वर्मा यांचा हा डान्स पाहून नेटकऱ्यांनी चांगल्या कमी आणि संतप्तच प्रतिक्रिया जास्त दिल्या आहेत. 

कलाकारांच्या बर्थडे पार्टी आणि तिथं होणारा कल्ला हे सारंकाही प्रेक्षकांसाठी नवं नाही, पण अशा पद्धतीनं गोष्टी समोर आल्यामुळं आणि या विचित्र सेलिब्रेशनमुळं याच सेलिब्रिटींना चाहत्यांच्या रोषाला सामोरं जावं लागत आहे. राम गोपाल वर्मा हे सध्या याचाच सामना करत असावेत.