'...तर मी लेक आणि नवऱ्यासोबत भारतात येईन', इलियाना डिक्रूजचे वक्तव्य

या मुलाखतीवेळी तिला 2024 या वर्षात तू कोणत्या चित्रपटात झळकणार आहेस का? तुझे यावर्षीचे काही खास प्लॅन्स आहेत का? याबद्दल विचारणा करण्यात आली. त्यावर तिने भाष्य केले.  

Updated: Jan 5, 2024, 08:35 PM IST
'...तर मी लेक आणि नवऱ्यासोबत भारतात येईन', इलियाना डिक्रूजचे वक्तव्य title=

ileana d'cruz on coming India: इलियाना डिक्रूज ही बॉलिवूडमधील लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. गेल्या काही महिन्यांपासून ती मातृत्वाचा आनंद घेत आहे. सध्या ती तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आहे. नुकतंच इलियानाने एका मुलाखतीदरम्यान तिचे लग्न, बाळ झाल्यानंतर तिचे आयुष्य याबद्दल भाष्य केले आहे. यावेळी तिने 2024 मधील तिचे काही प्लॅनही सांगितले आहेत.

इलियाना डिक्रूजने नुकतंच टाइम्स ऑफ इंडिया या वेबसाईटला मुलाखत दिली. यावेळी तिला तिच्या बाळाबद्दल आणि त्यांच्या बाबांबद्दल विविध प्रश्न विचारण्यात आले. त्यावर तिने स्पष्टपणे भाष्य केले. या मुलाखतीवेळी तिला 2024 या वर्षात तू कोणत्या चित्रपटात झळकणार आहेस का? तुझे यावर्षीचे काही खास प्लॅन्स आहेत का? याबद्दल विचारणा करण्यात आली.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Ileana D'Cruz (@ileana_official)

यावर उत्तर देताना ती म्हणाली, "2024 हे वर्षे माझ्यासाठी वैयक्तिक आणि व्यावसायिकदृष्टीने खूपच व्यस्त असणार आहे. मला असं वाटतंय की हे वर्ष माझ्यासाठी फारच खास असणार आहे. फक्त बाळामुळे नाही तर कामाच्या दृष्टीनेही हे वर्ष महत्त्वाचे असेल. मी प्रेग्नेनंसीपूर्वी अनेक चित्रपटांचे शूटींग केले आहे. तसेच काही प्रोजेक्टचं कामही संपवलं आहे. त्यामुळेच मला आराम करण्यास आणि प्रेग्नेनंसीचा आनंद घेण्यासाठीचा वेळ मिळाला." 

"मला असं वाटतंय की 2024 हे वर्ष माझ्यासाठी फारच चांगलं असणार आहे. मी अशी आशा करते की, या वर्षभरात माझे प्रोजेक्ट प्रदर्शित व्हावेत. जेणेकरुन मी माझा लेक आणि नवऱ्यासोबत प्रमोशनसाठी भारतात येऊ शकेन. तसेच मला लेकसोबत सेटवरही यायला आवडेल", असे इलियानाने सांगितले. 

दरम्यान इलियाना डिक्रूजचे ‘बर्फी’, ‘रुस्तम’, ‘रेड’, मै तेरा हीरो’, ‘बादशाहो’ हे चित्रपट प्रचंड गाजले. या चित्रपटातील तिच्या अभिनयाचे प्रचंड कौतुक झाले. इलिया ही द बिग बूल या चित्रपटात शेवटची झळकली. आता लवकरच ती रणदीप हुड्डासह एका चित्रपटात झळकणार आहे. मात्र अद्याप याबद्दल अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही.