neha shitole:अभिनेत्री नेहा शितोळेने फक्त मालिका विश्व नाही तर मराठी चित्रपटसृष्टी , मराठी रंगभूमिवर आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला आहे. बिग बॉस मराठीच्या दुसऱ्या पर्वाची ती उपविजेती होती. सोशल मिडियावर नेहा तीच्या कवितेतून तिच्या चाहत्यांना नेहमी वेगळी पर्वणी देत असते. आत्ता बिग बॉसनंतर ती नेमकं काय करत होती याबद्दल तीनं सांगितलं आहे. सध्या सगळीकडे चर्चा सुरू आहे ती म्हणजे नेहा शितोळेच्या या कामाची.
साऊथचं बॉक्स ऑफिस गाजवणारा प्रसिद्ध तेलुगू चित्रपट ‘सिता रामम्’.या चित्रपटात साऊथ सुपरस्टार दुलकर सलमान, मृणाल ठाकूर आणि नॅशनल क्रश रश्मिका मंदाना यांची प्रमुख भूमिका आहे. या चित्रपटानं फक्त साऊथ चित्रपटसृष्टी नाही तर हिंदीं बॉक्स ऑफिससुद्धा गाजवलं होतं. या चित्रपटाचं हिंदी संवादलेखन नेहा शितोळेने अवघ्या 5 दिवसात पुर्ण केलं होतं.
नुकत्याच एका मुलाखतीत नेहा शितोळेनी ही गोष्ट सांगितली होती . नेहा म्हणाली, “मधल्या काळात मी खूप लिखाणाचं काम केलं. पण सगळ्यांनाच माहितेय ते काम असं नाही. म्हणजे ‘सीता रामम्’ नावाचा एक तेलुगू चित्रपट आहे. दुलकर सलमान आणि मृणाल ठाकूर हे दोघं जण त्याच्यामध्ये प्रमुख भूमिकांमध्ये आहेत. तर त्या चित्रपटाचे संपूर्ण हिंदी संवाद मी लिहिलेत. कारण अत्यंत लिरिकल (lyrical) चित्रपट आहे. अत्यंत रोमँटिक, काव्यात्मक असा चित्रपट आहे आणि त्याच्यातले संवादही तसेच असले पाहिजेत. ते असे रोखठोक नुसतं तेलुगू टू हिंदी ट्रान्सलेशन केल्यासारखे संवाद होत होते. हिंदी भाषेची गंमत त्याच्यात येत नव्हती. मी म्हटलं ठीक आहे, ‘कधीपासून काम सुरू करुयात.’ तो म्हणाला, ‘आता.’ पुढच्या ५ दिवसांत आम्ही खरंच दिवसरात्र त्या स्टुडिओमध्ये राहिलो, काम केलं. ५ दिवसांत आम्ही तो चित्रपट लिहून पूर्ण केला होता.”
नेहाच्या या कामगिरीमुळे सगळीकडे तीचं कौतूक होत आहे. सध्या सोशल मिडियावर तिचे चाहते तिचं खूप कौतूक करत आहेत.