सुनंदा पुष्कर यांच्या भूमिकेत दिसणार 'ही' अभिनेत्री

अनुत्तरित प्रश्नांची उत्तरं मिळणार का? 

Updated: Oct 29, 2018, 08:48 AM IST
सुनंदा पुष्कर यांच्या भूमिकेत दिसणार 'ही' अभिनेत्री title=

मुंबई : प्रयोगशीलता हे मुल्यं चित्रपटसृष्टीत अगदी सुरेखपणे हाताळलं जात असल्याचं अनेकदा पाहायला मिळालं आहे. चरित्रपट म्हणू नका किंवा एखादा भयपट. चित्रपटाच्या माध्यमातून एखादी सत्य किंवा काल्पनीक घटना प्रेक्षकांपर्यंत पोहोचवणं यावरच कलाकार मंडळींचा भर असतो. 

चित्रपटांच्या या गर्दीत गेल्या काही वर्षांपासून प्रेक्षकांची पसंती मिळणारे चित्रपट म्हणजे बायोपिक आणि थरारपट पठडीत मोडणारे. अशाच चित्रपटांमध्ये आता आणखी एका चित्रपटाची तयारी सुरु असल्याचं कळत आहे. 

कॉंग्रेस नेते शशी थरुर यांची पत्नी सुनंदा पुष्कर यांच्या मृत्यूमागचं गुढ उकलण्याचा प्रयत्न या चित्रपटातून केला जाणार आहे. 

 सुनंदा पुष्कर यांची भूमिका साकारण्यासाठी सध्याच्य़ा घडीला अभिनेत्री दीपिका पदुकोण हिच्या नावाला पसंती दिल्याचं कळत आहे. 

येत्या काही दिवसांमध्ये दीपिकाकडे या चित्रपटासाठीची विचारणा करण्यात येण्याचीही चिन्हं आहेत. 

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार दीपिकापुढे या चित्रपटाचा प्रस्ताव लवकरच ठेवण्यात येणार आहे. 

सुनंदा पुष्कर यांच्या मृत्यूमागे अनेक प्रश्न हे निरुत्तरितच राहिले आहेत. याच प्रश्नांचा आधार घेत त्यांची कहाणी ही रुपेरी पडद्यावर साकारली जाणार आहे. 

सुनंदा पुष्कर यांचा मृत्यू २०१४ मध्ये झाला होता. दिल्लीतील लीला पॅलेस या हॉटेलच्या रुम नंबर ३४५ मध्ये त्या मृतावस्थेत आढळल्या होत्या. सुरुवातचीला त्यांनी आत्महत्या केली असं म्हटलं जात होतं. पण, तपासादरम्यान त्यांच्या शरीरावर जखमा दिसल्यामुळे ही हत्या असल्याच्या चर्चांनीही जोर धरला होता. 

कोण होत्या सुनंदा पुष्कर ?

सुनंदा पुष्कर या माजी केंद्रीय मंत्री शशी थरुर यांच्या पत्नी होत्या. 

थरुर हे सुनंदा यांचे तिसरे पती होते. २०१० मध्ये ते दोघं विवाहबंधनात अडकले होते. 

शशी थरुर यांच्याशी संपर्कात आल्यानंतर सुनंदा पुष्कर यांची 'आयपीएल'च्या कोच्ची टीममध्ये भागीदारी जाहीर झाली होती. ज्यानंतर त्यांच्या नात्याची चर्चा रंगू लागली झाली. 

अखेर शशी थरुर यांनी सुनंदा यांच्याशी आपलं नातं स्वीकारलं ज्यानंतर २२ ऑगस्ट २०१० रोजी केरळमध्ये ५४ वर्षांचे शशी थरूर आणि ४८ वर्षांच्या सुनंदा पुष्कर यांच्याबरोबर विवाहबंधनात अडकले होते.