सौंदर्याची खाण असणाऱ्या बॉलिवूड अभिनेत्रीला कोणी दिला ब्रेस्ट इम्प्लांटचा सल्ला ?

अनेकांनी असे काही सल्लेही दिले जे ती आतापर्यंत विसरू शकलेली नाही. 

Updated: Feb 28, 2022, 10:30 AM IST
सौंदर्याची खाण असणाऱ्या बॉलिवूड अभिनेत्रीला कोणी दिला ब्रेस्ट इम्प्लांटचा सल्ला ?  title=
छाया सौजन्य- सोशल मीडिया

मुंबई : आँखों मे तेरी... हे गाणं वाजू लागलं की रेट्रो काळातील अभिनेत्रीच्या लूकमध्ये समोर अभिनेत्री दीपिका पदुकोण हिचा चेहरा उभा राहतो. चित्रपट वर्तुळामध्ये पदार्पण केल्यापासून ते अगदी आतापर्यंतही दीपिकाची जादू कमी झालेली नाही. 

नव्या जोमाच्या अभिनेत्रींसाठी तर दीपिका म्हणजे जणू एक आदर्श. मोठ्या समर्पकतेनं तिनं आतापर्यंत सर्व भूमिका साकारल्या. वेळीस अपयशही पचवलं. 

तिचा आतापर्यंतचा प्रवास अर्थात सोपा नव्हता. अनेकांनी असे काही सल्लेही दिले जे दीपिका आतापर्यंत विसरू शकलेली नाही.

वयाच्या अवघ्या 18 व्या वर्षी तिला ब्रेस्ट इम्प्लांटचा सल्ला देण्यात आला होता. हा सल्ला तिलाही हैराण करून गेला. पण, हुशारी दाखवत तिनं कोणत्याही प्रकारटी सर्जरी अथवा ब्रेस्ट इम्प्लांट केलं नाही. 

कला जगतामध्ये मादकतेच्या रुपात सर्वांसमोर येण्यासलाठी आजवर अनेक अभिनेत्रींनी सर्जरी केल्याचं आपण पाहिलं असेल. दीपिकालाही असाच सल्ला दिला गेला होता. पण, तिनं मात्र याकडे फार गांभीर्यानं पाहिलं नाही. 

हल्लीच दीपिका शकुन बत्रा दिग्दर्शित 'गहराईयां' या चित्रपटातून झळकली होती. चित्रपटाला संमिश्र प्रतिसाद मिळालेला असला, तरीही त्यात दीपिकाचा अभिनय सर्वांचीच मनं जिंकून गेला.