दीपिकाच्या नव्या घरात 'या' अभिनेत्याला प्रवेश नाही

पण, या घरात एका प्रसिद्ध बॉलिवूड सेलिब्रिटीला प्रवेश नाकारला आहे. 

Updated: Sep 8, 2019, 12:26 PM IST
दीपिकाच्या नव्या घरात 'या' अभिनेत्याला प्रवेश नाही title=
दीपिका पदुकोण

मुंबई : अभिनेत्री दीपिका पदुकोण सध्या तिच्या आगामी चित्रपटांमध्ये व्यग्र आहे. चित्रीकरण, प्रसिद्धी, जाहिराती या साऱ्या व्यापातून ती तिच्या खासगी आयुष्यालाही वेळ देत सर्वच गोष्टींमध्ये योग्य तो समतोल राखण्याचा प्रयत्न करत आहे. कामाच्या व्यापात व्यग्र असणाऱ्या दीपिकाने आता एक नवं घरंही घेतलं आहे. पण, या घरात एका प्रसिद्ध बॉलिवूड सेलिब्रिटीला प्रवेश नाकारला आहे. 

आता दीपिकाच्या घरात नेमकी कोणत्या सेलिब्रिटीला एंट्री नाही...?, असाच प्रश्न तुम्हालाही पडलाच असेल ना.... दीपिकाच्या घरात प्रवेश नाकारला गेलेला हा सेलिब्रिटी आहे, तिचा खास मित्र, अभिनेता रणबीर कपूर. रणबीर आणि दीपिकामध्ये आता असं काय झालं की तिने थेट त्याला घरात घेण्यासच नकार दिला... असा प्रश्न तुम्हाला पडण्यापूर्वी हा व्हिडिओ पाहाच.... 

रुपेरी पडद्याव विविध चित्रपटांमधून स्क्रीन शेअर करणारी आणि प्रेक्षकांच्या मनात घर करणारी ही जोडी, आता एका जाहिरातीतून एकत्र झळकत आहे. या जाहिरातीच्याच निमित्ताने दीपिकाने रणबीरला मोठ्या खोडकर अंदाजात तिच्या घरात न घेणार असल्याचं सांगितलं आहे. अतिशय गमतीदार अशा या जाहिरातीचा व्हिडिओ नुकताच प्रदर्शित करण्यात आला आहे. 

एशियन पेंट्सच्या या जाहिरातीत रणबीर आणि दीपिकाची ऑनस्क्रीन केमिस्ट्री पुन्हा एकदा पाहायला मिळत आहे. एकेकाळी एकमेकांच्या प्रेमात असणारे सेलिब्रिटी ते आताच्या घडीला एकमेकांचे अतिशय चांगले मित्र असण्यापर्यंतचा या दोघांचाही प्रवास अनेकांनाच ठाऊक आहे. या जोडीची हीच लोकप्रियता लक्षात घेत जाहिरातीच्या निमित्ताने का असेना, पण त्यांना एकत्र पाहण्याची संधी प्रेक्षकांना मिळाली आहे.