जेव्हा बॉलिवूड अभिनेत्री चुकून पुरूष प्रसाधनगृहात जाते

काय म्हणाली अभिनेत्री...

Updated: Sep 8, 2019, 12:08 PM IST
जेव्हा बॉलिवूड अभिनेत्री चुकून पुरूष प्रसाधनगृहात जाते title=

मुंबई : अभिनेता आयुषान खुरना आणि नुसरत भरूचा सध्या त्यांचा आगामी 'ड्रीम गर्ल' चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. यादरम्यान तिने एका गंमतीदार गोष्टीचा खुलासा केला आहे. स्पॉट बॉयने चित्रपटासंबंधीत नुसरतला एक प्रश्न विचारला. 'चित्रपटात आयुषमान मुलीच्या रूपात लोकांसह संवाद साधत आहे. असाच एखादा किस्सा तुझ्या आयुष्यात कधी आला आहे का?' स्पॉट बॉयच्या या प्रश्नावर तिने फार गंमतीदार उत्तर दिले आहे. 

नुसरत चुकून एकदा पुरूष प्रसाधनगृहात गेली होती. तिच्या या लाजिरवाण्या अनुभवावर संवाद साधताना ती म्हणाली, 'मी एकदा चुकून पुरूष प्रसाधनगृहात गेली होती. पण तेव्हा आत कोणीच नव्हतं त्यामुळे मला जास्त लाजिरवाणं वाटलं नाही.' 

'ड्रीम गर्ल' चित्रपटाचं दिग्दर्शन राज शांडिल्य करत असून चित्रपटाची निर्मिती एकता कपूर, शोभा कपूर आणि आशीष सिंह करत आहेत. हा चित्रपट १३ सप्टेंबर रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.