मुंबई : कालच दसरा आणि दूर्गा पूजेचा उत्सव पार पडला. उत्सवांच्या या दिवसांमध्ये बॉलिवूड कलाकारांचे वेगळे लूक पाहायला मिळतात. बॉलिवूड अभिनेत्रींनी दुर्गापूजेत सिंदूर खेळतानाचे फोटो सोशल मीडियावर पोस्ट केलेत. यामध्ये राणी मुखर्जी आणि काजोल तसेच बिपाशा बसू यांचा समावेश आहे. मित्र-परिवार आणि कुटुंबासोबत हा सण साजरा केला.
यावेळी सिंदूर खेळण्याची पद्धत असते. यंदा बिपाशा बसूची लग्नानंतरची पहिली दुर्गापूजा यावेळी ती अभिनेता आणि पती करणसोबत मनसोक्त सिंदूर खेळताना दिसली. यावेळी अभिनेत्री बिपाशा आणि अभिनेता करण ग्रोवर सफेद रंगाच्या कपड्यांमध्ये दिसले. बिपाशाने सफेद साडी, लाल टिकली आणि गडद लाल रंगाचे सिंदूर लावले होते. बिपाशा दरवर्षी दुर्गा पूजा आनंदात साजरी करते. पण यंदाची दूर्गा पूजा खास होती.
तसेच तनीषा मुखर्जी देखील या सिंदूरमध्ये रंगली होती. तिने आपल्या ऑफिशिअल इंस्टाग्राम अकाऊंटवर फोटो शेअर केले आहे. या फोटोत फिल्ममेकर करण जोहर, काजोल, राणी मुखर्जी, तनीषा, नताषा पूनावाला आणि अयान मुखर्जी दिसत आहेत.
अभिनेत्री काजोल आणि अभिनेत्री राणी मुखर्जी या एकमेकांच्या नात्यात आहेत. त्यामुळे दुर्गापूजेला या दोघी एकत्र भेटल्या. त्यांनी यावेळी एकमेकांना सिंदूर लावून हा सण साजरा केला.