भयंकर Rape Scene च्या चित्रीकरणानंतर मला....; पाहा अनुष्काची काय अवस्था

रेप सीन चित्रीकरण करणाऱ्या प्रत्येक अभिनेत्रीचा ... 

Updated: Nov 23, 2021, 11:08 AM IST
भयंकर Rape Scene च्या चित्रीकरणानंतर मला....; पाहा अनुष्काची काय अवस्था title=

मुंबई : कोणताही चित्रपट पाहताना त्यामध्ये एखादा रेप सीन आला म्हणजेच एखादं बलात्काराचं दृश्य सुरु झालं, की अनेकदा चॅनल बदललं जातं. किंवा त्या काही मिनिटांसाठी लक्ष विचलित केलं जातं. पण, जी दृश्य पाहण्यासाठी आपण कुटुंबासमवेत असताना काहीसे बुझल्यासारखे होतो, तिच दृश्य चित्रीत करण्यासाठी कलाकारांना किती अडचणींचा सामना करावा लागत असेल, याचा वितार तुम्ही कधी केला आहे का? 

रेप सीन चित्रीकरण करणाऱ्या प्रत्येक अभिनेत्रीचा अनुभव खूप काही सांगून जातो. 

बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्ट, अनुष्का शर्मा, सोनम कपूर यांनी एका मुलाखतीदरम्यान, याच मुद्द्यावर आपल्या मनातील भावना व्यक्त केल्या होत्या. (Alia bhatt, Anushka sharma)

अनुष्का शर्मा हिनं सांगितल्यानुसार रेप सीनच्या चित्रीकरणानंतर अशीही वेळ आली, जेव्हा तिनं नैराश्याचा सामना केला होता. 

'एनएच10' या चित्रपटाचं उदाहरण देत ज्यावेळी दृश्य अतिश. वास्तववादी दाखवण्याचा प्रयत्न असतो तेव्हा त्यासाठी तुम्हाला त्या ताकदीची मेहनत घ्यावी लागते ही वस्तुस्थितीही तिनं मांडली. 

'एनएच10' या चित्रपटामध्ये अनुष्का रात्रीच्या वेळी एकटी असतानाच काहीजण तिचा पाठलाग करताना दाखवण्यात आलं आहे. अनेक ठिकाणी हे चित्र प्रत्यक्षात आजही पाहायला मिळतं ही शोकांतिका. 

चित्रपटातील या दृश्याच्या वेळी आपण ठीक असल्याचं अनुष्कानं सांगितलं. पण, त्यानंतर 2 दिवसांनी मात्र आपण भावनात्मकरित्या तुटलो होतो असं तिनं सांगितलं. 

एखाद्या व्यक्तीची मानसिकता नेमकी कोणत्या पातळीपर्यंत जाऊ शकते याचा विचार करुन तिला धक्का बसला होता. 

'उडता पंजाब'मधील अशाच एका दृश्याबाबत सांगत चेहऱ्याच्याच माध्यमातून यावेळी सर्व काही व्यक्त करायचं होतं, पण हे दृश्य सुरु असताना ते लवकरात लवकर संपावं हेच मनात असतं असं तिनं स्पष्ट केलं. 

चित्रपटात अशा दृश्याच्या चित्रीकरणावेळी आणि दृश्य चित्रीत झाल्यानंतरही आपल्या मनात एक प्रकारची भीती कायम असते, असं आलियानं सांगितलं होतं. 

मनोरंजनाचा भाग म्हणून जे चित्रपट आपल्यापुढे सादर होतात, ते साकारताना कलाकारांना काही अडचणींचाही सामना करावा लागतो याचीच यातून प्रचिती आली.