मुंबई : बॉलिवूडच्या स्टार्संना सिनेमांमधून नाव, पैसा, प्रसिद्धी भरपूर मिळते. तरी देखील त्यांचे इतर अनेक व्यवसाय सुरु असतात. त्यातूनही ते बक्कळ पैसा कमावतात. बॉलिवूडचे हे स्टार्स साईड बिजनेसमधून कोटींचे उत्पन्न घेतात...
या यादीत सर्वात पहिले नाव आहे ९० च्या दशकातील अभिनेत्री करिश्मा कपूरचं. अनेक हिट सिनेमे दिल्यानंतर सध्या सिनेमांपासून दूर असलेली करिश्मा ई-कॉमर्स पॉर्टल चालवते. यावरुन बेबी आणि मदर केअर प्रॉडक्ट्स विकले जातात.
सुरुवातीला साईड रोल करणारे मिथुन चक्रवर्ती कालांतराने प्रमुख भूमिकांमध्ये दिसू लागले. सिनेमांव्यतिरिक्त ते हॉस्पिटॉलिटी आणि एज्युकेशन सेक्टरमध्ये मोनार्क ग्रुप कंपनी चालवतात. त्याचबरोबर त्यांचे पेपराजी फिल्म प्रॉडक्शन हाऊसही आहे.
बॉलिवूडचा खिलाडी अक्षय कुमारचे प्रत्येकजण कौतुक करतं. अक्षय दरवर्षी ३-४ सिनेमे घेऊन येत असतो. त्याचे अनेक सिनेमे हिट ठरतात. पण याशिवाय अक्षय कुमार बेस्ट डिल टीव्ही नावाचे एक ऑनलाईन शॉपिंग चॅनल चालवतो. त्याचबरोबर त्याचे हरि ओम इंटरटेनमेंट फिल्म प्रॉडक्शन हाऊस देखील आहे.
९० च्या दशकात अभिनेता अजय देवगन हिट ठरला. अजूनही त्याचे यश काही कमी झालेले नाही. पण त्याचबरोबर अजय रोहा ग्रुपचा पार्टनर आहे आणि देवगन इंटरटेनमेंट सॉफ्टवेअर लिमिटेडचा मालक आहे.
आपल्या विशिष्ट शैलीने अनेक सिनेमात झळकलेला अभिनेता सुनील शेट्टी. सिनेमांशिवाय तो रेस्टॉरंट, नाईट क्लब आणि पोपकॉर्न फिल्म प्रॉडक्शनचा मालक आहे.
आपल्या विशिष्ट शैलीने अनेक सिनेमात झळकलेला अभिनेता सुनील शेट्टी. सिनेमांशिवाय तो रेस्टॉरंट, नाईट क्लब आणि पोपकॉर्न फिल्म प्रॉडक्शनचा मालक आहे.