विक्की कौशलला भावलं मराठी सिनेमाचं गाणं, शेअर केली पोस्ट

सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला 

Updated: Oct 9, 2019, 03:04 PM IST
विक्की कौशलला भावलं मराठी सिनेमाचं गाणं, शेअर केली पोस्ट  title=

मुंबई : घरी एकट्या असणाऱ्या बाळाला भेटण्यासाठी बुरूज उतरणाऱ्या हिरकणीची कथा आता 'हिरकणी' या सिनेमारूपात येत आहे. हिरकणी म्हणजे हिराची भूमिका अभिनेत्री सोनाली कुलकर्णी साकारत आहे. हिराचा जीव ज्या व्यक्तीवर आहे तो म्हणजे तीचा नवरा जीवा. सिनेमात या जीवाची भूमिका अभिनेता अमित खेडेकर साकारत आहे. अमित आणि सोनाली ही फ्रेश जोडी प्रेक्षकांना या सिनेमातून पाहायला मिळेल. 

'हिरकणी' या सिनेमातील हिरा आणि जीवाच्या प्रेमकथेवरील गाणं नुकतंच लाँच झालं. 'जगनं हे न्यारं झालं जी' हे सिनेमातील प्रेमगीत आहे. हे प्रेम गीत या दोघांच्या नात्यातील हळुवारपणा उलघडताना दिसत आहे. हे गाणं अभिनेता विक्की कौशलला इतकं भावलं आहे की, त्याने या गाण्याची पोस्ट ट्विटरवर केली आहे. तसेच त्याने सिनेमाला शुभेच्छा देखील दिल्या आहेत. 

हिरकणी या सिनेमाचं दिग्दर्शन राष्ट्रीय पुरस्कार विजेता प्रसाद ओक यांनी केलं आहे. 'जगनं हे न्यारं झालं जी' हे गाणं संजय पाटील यांनी लिहिले असून अमितराज यांनी संगीत दिलं आहे. तसेच हे गाणं गायिका मधुरा कुंभारने गायलं आहे. या सिनेमातील शिवराज्याभिषेक गीत देखील प्रेक्षांना खूप आवडलं. आतापर्यंत अनेक शिवराज्याभिषेकाची गाणी झाली पण हे गाणं ऐकल्यावरच वेगळं असल्याचं जाणवतं.