VIDEO : अशी झाली सर्जिकल स्ट्राईकची तयारी

'पुढच्या आठ दिवसांमध्ये सर्जिकल स्ट्राईक करायचंय'  

Updated: Dec 25, 2018, 09:38 AM IST
VIDEO : अशी झाली सर्जिकल स्ट्राईकची तयारी title=

मुंबई : Uri Song challa भारतीय सैन्यदलाकडून आतापर्यंत केल्या गेलेल्या कारवायांमधील एक महत्त्वाची कारवाई म्हणजे सर्जिकल स्ट्राईक. पाकव्याप्त काश्मिरमध्ये जाऊत्रन दहशतवादी कारवाई रोखण्यासाठी भारतीय सैन्याकडून काही वर्षांपूर्वी सर्जिकल स्ट्राईक करण्यात आलं. त्याचीच हकिगत सांगण्यासाठी बॉलिवूडमध्ये एक कलाकृती साकारण्यात आली आहे. 

'उरी- द सर्जिकल स्ट्राईक' नावाचा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येण्यासाठी सज्ज झाला असून त्या माध्यमातून सर्जिकल स्ट्राईकमध्ये महत्त्वपूर्ण योगदान देणाऱ्या सैन्यदल अधिकाऱ्यांच्या कामगिरीवर आणि एकंदरच या धाडसी कारवाईवर प्रकाशझोत टाकण्यात येणार आहे. काही दिवसांपूर्वीच विकी कौशलची मुख्य भूमिका असणाऱ्या या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला. ज्यामागोमागच आता त्यातीत गाणं सर्वांच्या भेटीला आलं आहे. 

'छल्ला... मै लड जाणा', असे बोल असणाऱ्या या गाण्याच्या माध्यमातून अवघ्या काही मिनिटांमध्ये सर्जिकल स्ट्राईकसाठी सैन्यदल अधिकाऱ्यांनी कशा प्रकारे तयारी केली होती यावर भाष्य करण्यात आलं आहे. हे गाणं श्रवणीय असून, सळसळणाऱ्या रक्तात पुन्हा देशप्रमाची भावना जागवत आहे. रोमी, विवेक हरिहरन आणि शाश्वत सचदेव यांनी गायलेलं हे गाणं कुमारने लिहिलं असून, शाश्वतनेच त्याला संगीतबद्ध केलं आहे. 

गाण्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर बराच गाजत असून विकी कौशलचा अभिनय चित्रपटापूर्वीच चाहत्यांची मनं जिंकत आहे. त्यामुळे ११ जानेवारी २०१९ ला प्रदर्शित होणाऱ्या या चित्रपटासाठीची उत्सुकता आतापासूनच शिगेला पोहोचली आहे. तेव्हा आता अतिशय महत्त्वाचा मुद्दा हाताळणारा हा चित्रपट नव्या वर्षात बॉक्स ऑफिसवर उल्लेखनीय कामगिरी करण्यात यशस्वी ठरणार का, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.