स्वत:च्या जबाबदारीवरच पाहा Bhootचा ट्रेलर

सुरुवातीलाच हा इशारा देण्यात आला आहे, कारण....

Updated: Feb 6, 2020, 07:12 PM IST
स्वत:च्या जबाबदारीवरच पाहा Bhootचा ट्रेलर  title=
छाया सौजन्य- सोशल मीडिया

मुंबई : बॉलिवूडमध्ये आघाडीच्या कलाकारांना टक्कर देणारा विकी कौशल vicky kaushal आता आणखी एका नव्या रुपात प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. यावे़ळी विकी चाहत्यांचं मनोरंजन करण्यापेक्षा त्यांनी घाबरवण्यासाठीच आला आहे, असं म्हणायला हरकत नाही. याला निमित्त ठरतोय तो म्हणजे त्याच्या Bhoot:  The Haunted Ship या आगामी चित्रपटाचा ट्रेलर. 

सोशल मीडियावर नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला. ज्याचीच चर्चा चित्रपट वर्तुळात सुरु आहे. प्रेक्षकांनीही या भटपटाविषयी उत्सुकता आणि कुतूहल व्यक्त केलं आहे. खराब हवामानामुळे एक जहाज किनाऱ्यावर लागलेल्या एका जहाजाच्या दृश्यापासून या ट्रेलरची सुरुवात होते. यामध्ये विकी कौशल हा पृथ्वी नावाचं पात्र साकारत आहे. पुढे प्रत्येक दृश्यातून चित्रपटाच्या कथानकाच्या दृष्टीने काही महत्त्वाच्या गोष्टी उलगडत जातात. 

 
 
 
 

A post shared by Vicky Kaushal (@vickykaushal09) on

एक अनोळखी आणि तितकंच मनुष्यविरहित जहाज, त्यामध्ये असणारी प्रत्येक वस्तू, घडणारी प्रत्येक घटना ही काहीतरी सांगत असल्याचं या ट्रेलरमध्ये पाहायला मिळत आहे. आता या घटना नेमक्या का घडत आहेत आणि त्या घडण्यामागे नेमकी काय कारणं आहेत, हे चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर प्रेक्षकांना पाहता येणार आहे. 

हिरू यश जोहर, करण जोहर, अपूर्व मेहता आणि शशांक खैतान हे या चित्रपटाचे निर्माते आहेत. भानू प्रताप सिंह दिग्दर्शित या चित्रपटाच्या ट्रेलरमधूनच भीतीची अनुभूती होत आहे. त्यामुळे प्रदर्सनानंतर प्रेक्षकांमध्ये 'भूत' थरकाप उडवणार, असं म्हणणं वावगं नाही. २१ फेब्रुवारीला हा बहुप्रतिक्षित चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.

टॉप हेडलाईन्स

भरचौकात शिक्षिकेला जाळलं, घटनेविरोधात विद्यार्थिनींचा आक्रोश

कोरोना व्हायरसची ज्याला लागण झाली त्याचा मृत्यू अटळ?

लक्ष्मीकांत बेर्डे यांचा अफलातून अभिनय,विनोदाचं टायमिंग एकदा पाहाच....

लोणीकरांनी 'हिरॉईन' उल्लेख केलेल्या महिला तहसीलदार सुट्टीवर

कुणाल कामरा राज ठाकरेंच्या भेटीसाठी कृष्णकुंजवर