Sidharth-Kiara Wedding : यंदा कर्तव्य आहे....नवीन वर्षात Sidharth Malhotra ची लगीन घाई

Sidharth Malhotra ने लग्नाबद्दल दिला एक मोठा इशारा, लवकरच...    

Updated: Dec 20, 2022, 06:33 PM IST
Sidharth-Kiara Wedding : यंदा कर्तव्य आहे....नवीन वर्षात  Sidharth Malhotra ची लगीन घाई title=
Bollywood actor Siddharth Malhotra and actress Kiara Advani will get married in 2023 nz

Sidharth-Kiara Wedding: बॉलिवूड अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा (Sidharth Malhotra) आणि अभिनेत्री कियारा अडवाणी (Kiara Advani) गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत आहेत. हल्ली त्यांच्या लग्नाच्या बातम्यांना वेगानं उधाण आलं आहे. दोघंही त्याच्या चित्रपटांमध्ये व्यस्त असताना देखील लग्नाचा विषय येताच दोघंही असं काहीसं विधान करतात ज्यामुळे सगळ्यांचे लक्ष त्यांच्यावर जाते. सध्या सिद्धार्थ मल्होत्रा हा रश्मिका मंदान्नासोबत मिशन मजनू या आगामी चित्रपटाचे प्रमोशन करत आहे. एका प्रमोशनल कार्यक्रमादरम्यान रेडिओ फिव्हर एफएम वरून आरजे सुप्रियाने सिद्धार्थ मल्होत्राला एका अफवेबद्दल विचारले ज्याबद्दल सिद्धार्थने स्पष्टीकरण देताना उत्तर दिले की, “मी या वर्षी लग्न करत आहे.” या विधानामुळे सर्वत्र एकच गोंधळ आहे. सिद्धार्थ मल्होत्रा आणि कियारा अडवाणी लवकरच लग्नबंधंनात अडकणार असल्याने त्यांच्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी आहे. 

 

लग्ना बाबतीत अनेक अफवा

सिद्धार्थ मल्होत्रा आणि अभिनेत्री कियारा अडवाणी यांच्या लग्ना बाबतीत अनेक अफवा समोर आल्या आहेत. काही महिन्यांपूर्वी एक अशी बातमी आली होती की ही दोन्ही जोडपी लग्नाची ठिकाणं शोधत आहेत. कियारा नुकतीच सिद्धार्थ मल्होत्राच्या घरी जाताना दिसली. पापाराझीने तिला त्याच्यासोबत दुपार घालवण्यासाठी वांद्रे येथील त्याच्या घरी जाताना पाहिले. मीडिया रिपोर्टनुसार 2023 मध्ये ते लग्न करणार आहेत असं सांगण्यात आले आहे. सध्या ते चंदीगडमध्ये लग्न करणार असल्याच्या बातम्यांना उधाण आलं आहे. 

 

लग्नबंधंनात अडकणार

या जोडप्याने अजूनही लग्नाच्या अफवांवार कोणत्याही प्रकारचे विधान केलेले नाही. मीडिया रिपोर्टनुसार असे सांगण्यात येते आहे की जानेवारी 2023 मध्ये सिद्धार्थ आणि कियारा लग्नबंधंनात अडकणार. सिद्धार्थ आणि कियाराने लग्नात येणाऱ्या पाहूणे मंडळींच्या यादीवर काम करण्यास सुरुवात केली आहे. यादीत करण जोहर, विकी कौशल, कतरिना कैफ, वरुण धवन, जॅकी भगनानी आणि त्याची प्रेयसी रकुल प्रीत सिंग यांनाही आमंत्रित केले जाण्याची शक्यता आहे. हे लग्न बहुप्रतिक्षित असल्यामुळे अनेकांना या लग्नाची उत्सुकता लागलेली आहे. 

सिद्धार्थ मिशन मजनूच्या तयारीत

सिद्धार्थ मिशन मजनूच्या रिलीजच्या तयारीत आहे. हा चित्रपट 20 जानेवारी 2023 रोजी OTT रिलीज होणार आहे.  कियारा अलीकडेच विकी कौशल आणि भूमी पेडणेकरसोबत गोविंदा नाम मेरा या चित्रपटात दिसली होती. ती पुढे कार्तिक आर्यनसोबत सत्यप्रेम की कथा आणि राम चरणसोबत RC15 मध्ये दिसणार आहे.