7 वर्षे तुरुंगवास... पण, बलात्कार पीडितेनंच केलं 'या' प्रसिद्ध अभिनेत्याला निर्दोष

या लोकप्रिय अभिनेत्यावर त्याच्या मोलकरणीनं हे गंभीर आरोप केले होते. अभिनेत्याच्या मदतीला तेव्हा कोणही उभं रहायला तयार नव्हतं... त्यावेळी त्याच्यासोबत फक्त एक व्यक्ती उभी राहिली होती.

Updated: Jan 6, 2023, 06:09 PM IST
7 वर्षे तुरुंगवास... पण, बलात्कार पीडितेनंच केलं 'या' प्रसिद्ध अभिनेत्याला निर्दोष title=

Shiney Ahuja Accuse Of Rape : बॉलिवूड अभिनेता शायनी अहुजाला (Shiney Ahuja) 7 वर्षांपूर्वी प्रदर्शित झालेल्या 'वेलकम बॅक' (Welcome Back) या चित्रपटात दिसली होता. शायनी अहुजाला बलात्काराच्या आरोपाखाली तुरुंगवास भोगावा लागला होता. खरंतर 'वेलकम बॅक' या चित्रपटात त्याची खूप छोटी भूमिका होती. 2009 साली शायनीवर बलात्काराचे आरोप करण्यात आले होते. त्यामुळे न्यायालयानं त्याला 7 वर्षांची शिक्षा सुनावली होती.

काय झालं होतं 2009 साली 

2009 साली शायनीवर त्याची मोलकरणीनं बलात्काराचा आरोप केला होता. त्यानंतर पोलिसांनी त्याला अटक केली आणि या प्रकरणात तपास सुरु केला. तपास सुरु झाल्यानंतर त्यानं केलेल्या गुन्ह्याचे गांभीर्य त्याला कळले नाही असे त्याने म्हटले. त्यानंतर 3 महिन्यानंतर तो जामिनावर सुटला, सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे ज्या महिलेनं शायनीवर बलात्काराचे गंभीर आरोप केले होते तिने ते मागे घेतले. मात्र, 2011 मध्ये न्यायालयानं शायनीला 7 वर्षांची शिक्षा सुनावली होती. 

चित्रपट निर्मात्यांनी शायनी अहुजाला दिले नाही काम

शायनी तुरुंगातून बाहेर आला, पण या घटनेने त्याच्या कामावर खूप मोठा परिणाम झाला. प्रेक्षकांसमोर त्याची पर्सनॅलिटी खराब झाली. यामुळे निर्मात्यांनी त्याला काम देण्यास नकार दिला. मात्र, त्याला एका व्यक्तीनं साथ दिली. ती व्यक्ती म्हणजे दुसरी-तिसरी कोणी नसून त्याची पत्नी अनुपम अहुजा आहे. अनुपमला विश्वास होता की शायनीला अशा गोष्टीची शिक्षा मिळाली आहे जे गुन्हे त्यानं केलेच नाही. 

हेही वाचा : Paternity Leave : पुरुष कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! Good News द्या आणि मिळवा...

अनुपम एका मुलाखतीत शायनीला मग कोणत्या गोष्टीची शिक्षा मिळाली असे विचारता ती म्हणाली, तिला नेमके कारण माहित नाही, परंतु सेलिब्रिटी किंवा सॉफ्ट टार्गेट असल्यामुळे असे असू शकते. शायनीचे शेजारी आणि मित्रही तिच्या समर्थनार्थ पुढे आले. पत्नीने हे वृत्त चुकीचे असून शायनी आपला गुन्हा कबूल केल्याचा दावा खोटा असल्याचे तिने सांगितले. 

मोलकरणीनं तिचे आरोप फेटाळले आणि शायनी हा निर्दोष असल्याचे म्हटले

न्यायालयात  पुन्हा अपील केल्यानंतर शायनीनं स्पष्टीकरण देत म्हटले की, त्यांच्यामध्ये जे काही झाले ते दोघांच्या संमतीने झाले. या महिलेनं आपल्या जबानीत शायनीला निर्दोष ठरवत शायनीच्या घरी काम मिळवून देणाऱ्या महिलेच्या सांगण्यावरून तक्रार केल्याचे सांगितले. यानंतर शायनीची जामिनावर सुटका झाली.

शायनीचा जन्म पंजाबी कुटुंबात झाला होता. त्याचे वडील सैन्यात होते. दिल्लीच्या हंसराज कॉलेजमधून त्यानं ग्रॅज्युएशन शिक्षण घेतले होते.  कॉलेजच्या काळापासूनच शायनीला अभिनयाची आवड होती. शायनीने 2006 मध्ये प्रदर्शित झालेल्या 'हजारों ख्वैशीं ऐसी' या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले, ज्यासाठी त्याला फिल्मफेअर सर्वोत्कृष्ट मेल डेब्यू अवॉर्ड मिळाला.